Nashik

काळ्या आईशी नाळ जुळलेला पोलीस अधिकारी

काळ्या आईशी नाळ जुळलेला पोलीस अधिकारी

विजय कानडे

नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांनी नुकताच स्वीकारला आणि आपल्या प्राधान्य क्रमातील कामांची यादी जाहीर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला, कारण साहेबांनी आपल्या प्राधान्य क्रमातले सर्वात पहिले काम म्हणजे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचे दिलेले आश्वासन होय, व त्या दृष्टीकोनातून उचललेले पाऊल म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा सुखद धक्काच म्हणावा.गेल्या अनेक वर्षापुसन काळ्या आईची सेवा करत घाम गाळून अत्यंत कष्टाने पिकवलेल्या आपल्या शेतमालाला धुर्तपणे खरेदी करून त्या शेतमालाचे पैसे न देता त्या शेतकऱ्यांची फसवणूक करणारे अनेक व्यापारी गेल्या अनेक दिवसांपासून आपला गोरख धंद्या सर्रास चालवताना आपण पहात आहोत, कायद्याचा धाकच नाही अश्या अविर्भावात वावरणाऱ्या त्या व्यापाऱ्यांची आता पळता भुई थोडी होणार आहे,
जे व्यापारी शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून त्याचा मोबदला बुडवण्याच्या प्रयत्नात राहतील किंवा शेतकऱ्यांना फसवून परप्रांतात पळून जाण्याचा प्रयत्न करतील अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यापारांच्या मुसक्या आवळल्या जातील असे साहेबांनी जाहीर करताच त्या व्यापाऱ्यांचे धाबेच दणाणले आहे व ज्या व्यापाऱ्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अडवून ठेवलेले पैसे अजूनही दिले नसतील त्यांनी ते त्वरित वर्ग करावेत असा सज्जड दम ही साहेबांनी त्या व्यापाऱ्यांना दिलेला आहे, बळीराजासाठी खऱ्या अर्थाने *सिंगम* रुपात अवतरलेले डॉ प्रतापराव दिघावकर हे नाशिक परीक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरलेले आहेत.अर्थात डॉ प्रतापराव दिघावकर साहेबांसाठी शेतकरी व शेती हा विषय काही नवीन नाही, मुळात साहेबांची नाळच काळ्या आईशी जुळलेली आहे, एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या साहेबांनी आपल्या शेतकरी वडिलांबरोबर शेतातील काम करतच आपले शिक्षण पूर्ण केले.शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज ह्याच उक्तीप्रमाणे साहेबांनी आपल्या जीवनाला शिस्त लावून घेतली व एका विशिष्ट ध्येयाच्या मार्गाने आपल्या जीवनाला आकार दिला, शालेय जीवनात असतांना आपल्या लहानपणी एसटी महामंडळाची लालपरी पाहून आपल्या आईला साहेबांनी प्रश्न विचारला की ही गाडी कुणाची., आईंचे उत्तर होते “”सरकारची”, आकाशातील उडत असलेल्या विमानाला पाहून आईला पुन्हा तोच प्रश्न केला उत्तर परत तेच होते “”सरकारचे” आणि तेव्हाच साहेबांनी ठरवरले की आपल्याला “सरकार” होयायचे. शाळेत गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नला साहेबांनी उत्तर ही तेच दिले, तुम्हाला मोठे होऊन काय होयायचे? उत्तर होते “”सरकार”. वर्गात उपस्तीत असलेले मित्र हसलेत परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते आणि साहेबांनी तेच केले, आणि म्हणून काळ्या आईशी निगडित असलेल्या ह्या पोलीस अधिकाऱ्याने सर्वात पहिले जे काम केले ते शेतकऱ्यांसाठीच, अर्थात आपल्या पोलीस सेवेतील जीवनामध्ये साहेबांनी समाजाप्रती असलेली आपली निष्ठा कुठलाही गाज्या वाज्या न करता जोपासली आहे.स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो हेच साहेबांनी दाखवून दिले. गावातील मुलांसाठी शाळा चालू केल्यात, ग्रामीण भागातील अनेक गावातील शाळांना अनुदान मिळवून दिले, जवळपास दहा हजार संख्या असलेल्या आपल्या पोलीस कॉन्स्टेबल सहकाऱ्यांना घरकुल बनवलेत,”वनश्री”आणि “इंदिरा प्रियदर्शनी” सारख्या अनेक प्रसिध्द पुरस्कार प्रदान करून साहेबांना गौरवण्यात आले आहे, साहेबांना युनायटेड नॅशन मध्ये बोलण्यासाठी सन्मानाने आमंत्रित केले गेले.ह्या आणि अश्या अनेक उपक्रमांमध्ये साहेबांनी आपला सहभाग नोंदवला आहे,
“”अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हाथ शोधत असतो आणि आपला ही हाथ असाच कुणाला तरी हवा असतो”.
नाशिक परिक्षेत्रातील तमाम शेतकऱ्यांना साहेबांनी असाच हाथ देऊन त्यांच्या समस्यारूपी अंधारातल्या प्रवासासाठी त्यांच्या हातांना बळ दिल आहे आणि म्हणून संपूर्ण शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास वाढला आहे, साहेबांच्या रूपाने शेतकऱ्यांना सुर्यप्रकाशा इतकी ताकत लाभली आहे. जो व्यापारी वर्ग त्यांना पोखरून पाहत होता तो आता वेठणीवर आल्याशिवाय राहणार नाही कारण “सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होतात”.नाशिक परिक्षेत्रातील तमाम पोलीस स्थानकांना व तत्सम अधिकाऱ्यांना साहेबांनी सदर विषयांव्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेतच परंतु प्रसार माध्यमातून साहेबांनी आपला मोबाईल नंबर ही जाहीर केला आहे.
सदर विभागातील कुठल्याही शेतकऱ्याची काही फसवणूक झाल्यास त्या शेतकऱ्याने सरळ साहेबांशी निःसंकोचपणे संपर्क साधावा असेही जाहीर आव्हान करण्यात आले आहे.””सद्सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत,
आदरणीय डॉ प्रतापराव दिघावकर साहेबांच्या रूपाने आज वरील ब्रीदवाक्या चा खऱ्या अर्थाने सर्वांना आदर वाटतो, तसेही साहेबांनी ठरवलेच आहे गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले, शेतकऱ्यांसाठी साहेब नेहमीच झुंजत राहतील ह्यात शंका नाही, साहेबांच्या कार्याने तमाम शेतकरी बांधव सुखावला आहेच परंतु त्या कडे साहेबांचे कौतुक करण्यास शब्द नाहीत म्हणूनच आपल्या बळीराजा तर्फेच हा पत्रप्रपंच भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं, बागलाण चा भूमिपुत्र म्हणून बागलाण वासीयांना साहेबांच्या ह्या अपूर्व कामगिरचा अभिमान तर आहेच आणि म्हणून तमाम बागलाण वासीयांतर्फे तसेच नाशिक परिक्षेत्रातील तमाम शेतकऱ्यांच्यावतीने, तमाम जनतेच्या वतीने आदरणीय डॉ.प्रतापराव(नाना) दिघावकर साहेबांचे मनस्वी अभिनंदन, आभार, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button