Surgana

मा.मंजुळा गावित आमदार साक्री मतदार संघ यांच्या कडे सुरगाणा शहरातील नळ पाणी योजना मंजूर व्हावी अमृता शाम पवार पाणीपुरवठा सभापती यांची मागणी

मा.मंजुळा गावित आमदार साक्री मतदार संघ यांच्या कडे सुरगाणा शहरातील नळ पाणी योजना मंजूर व्हावी अमृता शाम पवार पाणीपुरवठा सभापती यांची मागणी

विजय कानडे
सुरगाणा शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. आणि संपूर्ण शहराला पाणीपुरवठा पुरेसा होत नाही.जुनी पाईप लाईन मंजूर मा.खासदार चव्हाण आणि बबनराव घोलप यांच्या कडे मा.सरपंच धनराज कानडे यांनी पाठपुरावा करुन मार्गी लावला आता ती जुनी झाली असल्यामुळे पाईप लिकेज,मोटार बिघाड होत असतो.त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो.आणि त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असते. हया सर्व बाबीचा सारासार विचार करून मंजुळा गावीत हया सुरगाणा दोरा असताना सुरगाणा शासकीय विश्रागृहावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अमृता पवार पाणीपुरवठा सभापती यांच्या नेतृत्वखाली नवीन शहरातील पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी.असे निवेदन दिले आणि यावरती सखोल अशी चर्चा झाली.आणि माझं सासर सुरगाणा तालुका आहे.त्यामुळे एक भरीव अशी योजना माझ्या काळात व्हावी.अशी ईच्छा आमदार मंजुळा गावीत यांनी व्यक्त केली .या भेटी प्रसंगी डॉक्टर तुळशीराम गावित मा.जी प सदस्य, भरत वाघमारे नगर अध्यक्ष,रमेश थोरात स्वी. नगरसेवक,मालती खांडवी, रंजना लहरे,संजय पवार,सचिन महाले,सचिन आहेर,भगवान आहेर,शाम पवार,बाळू सूर्यवंशी, यशवंत देशमुख,प्रकाश वळवी,आदी उपस्थित नागरिक होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button