sawada

कायद्याच्या चौकटीत राहून भोंगे बंदीला सावदा येथे मंदिर-मस्जिद ट्रस्ट मंडळांनी दिला प्रतिसाद

कायद्याच्या चौकटीत राहून भोंगे बंदीला सावदा येथे मंदिर-मस्जिद ट्रस्ट मंडळांनी दिला प्रतिसाद

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील पोलिस ठाण्यात एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच शहरातील सर्व मंदिर व मस्जिद ट्रस्ट मंडळाच्या आदरनिय लोकांची बैठक घेण्यात आली.या प्रसंगी एपीआय देविदास इंगोले व पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना भोंगे संदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालय व शासकिय नियमावलीची सविस्तर रीत्या माहिती दिल्यानंतर बैठकीला उपस्थित सर्व समाज बांधवांनी पोलिसांच्या या आव्हानाला साथ देऊन थेट कायद्याच्या चौकटीत राहून भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा एक मुखी निर्णय यावेळी घेतला. यावेळी बैठकीत शहरातील विठ्ठल मंदिराचे संचालक माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, राधाकृष्ण मंदिराचे श्याम पाटील, गणपती मंदिराचे चंद्रकांत पाटील, स्वामीनारायण मंदिरातर्फे शास्त्री राजेंद्र प्रसादजी,मरीमाता मंदिराचे प्रमोद तेली,बाळू सिनके, खंडेराव वाडीचे नेमा भंगाळे,दुर्गा माता मंदिराचे संतोष शुल्क, तसेच जामा मस्जिद तर्फे सादिक मिस्तरी,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,शेख शरीफ अमजत मेकॅनिकल,काजीपुरा मस्जिदचे अब्दुल अजीज अब्दुल रशीद मोमीन,ताजुस्सशरीया व ख्वाजानगर मस्जिदचे मुकद्दर रिज़वी,कादीर खान,मुस्ताक भाई,बडा अखाडा मस्जिदचे जुम्मेदार अखतर मेकॅनिक,शेख शकील,खालिल सैय्यद,शब्बीर भाई टायर वाले,इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी यशवंत टाहकडे,देवेंद्र पाटील देखील आपले कर्तव्य बजावत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button