Rahata

सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटर ,महा इ सेवा केंद्र चालविणाऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा

सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटर ,महा इ सेवा केंद्र चालविणाऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा

राहता राहुल फुंदे

महाराष्ट्र मधील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटर ,महा इ सेवा केंद्र यासाठी काम करणारे व फक्त यावर अवलंबून असणारे केंद्र चालक यांना जीवन जगण्यासाठी निधी उपलब्ध करून मिळावा अहमदनगर जिल्ह्यातील आधार केंद्र चालक,आपले सरकार सेवा केंद्र चालक तसेच सेतू केंद्र चालक यांची मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे कडे मागणी

संपूर्ण महाराष्ट्र मधील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटर ,महा इ सेवा केंद्र हे मागील काही दिवसापासून कोरोना चा प्रादुर्भाव रोखणे साठी राज्य सरकारने बंद केलेले आहे ,

आपण मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोख पणे पार पाडत आहात सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र मेहनत घेवून कोरोना प्रादुर्भाव रोखणे साठी अहोरात्र मेहनत घेत आहेत,

परंतु याच दरम्यान मधील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटर ,महा इ सेवा केंद्र यासाठी काम करणारे व फक्त यावर अवलंबून असणारे केंद्र चालक यांची मागील काही दिवसापासून उपासमार होत आहे

सरकारचा पुढील आदेश येई पर्यंत महाराष्ट्र मधील सर्व आपले सरकार सेवा केंद्र ,तसेच महा इ सेवा केंद्र हि बंद राहणार आहे.

सदरील व्यवसायावर अवलंबून असणारे बरेच कुटुंब आहे बऱ्याच लोकांनी सदरील केंद्र सुरु करणे साठी बँके कडून कर्ज घेतले आहेत,बऱ्याच लोकांचे कार्यालय हे भाडोत्री जागेत आहे व त्यांना लाईट बिल,इंटरनेट बिल ,व इतर खर्च हा आज तागायत सुरु आहे ,

तरी आपणास सदरील इ मेल द्वारे आपणास विनंती आहे एक केंद्र चालक म्हणून महाराष्ट्रा मधील केंद्र चालक यांची उपासमार होऊ नये व सदरील केंद्र चालक अजून कर्जाच्या खाई मध्ये लोटले जाऊ नये म्हणून आपण सदरील सर्व केंद्र चालक यांचे साठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक,सेतू केंद्र चालक,तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालक यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना इ मेल करून विनंती केली आहे.

Leave a Reply

Back to top button