Maharashtra

कळंब तालुक्यातील सुपुत्राची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

कळंब तालुक्यातील सुपुत्राची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अंतिम निकालात सेवानिवृत्त एसटी वाहकाच्या मुलाने राज्यात दुसरा आणि मागास प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. कळंब तालुक्यातील बोर्डा येथील डॉ. रवींद्र आपदेव शेळके यांनी हे घवघवीत यश मिळविले. घरची बेताची परिस्थिती असतानाही सुरवातीला एमबीबीएस आणि आता थेट उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील बोर्डा या गावचे मुळ रहिवासी असलेल्या अपदेव शेळके यांचे सुपुत्र डॉ. रवींद्र शेळके यांची राज्यात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारून राज्यात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे…
या घवघवीत यशाने समस्त मित्र परिवार व कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button