Ausa

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने किल्लारी पोलिसांचे लामजना येथे पथसंचलन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने किल्लारी पोलिसांचे लामजना येथे पथसंचलन

प्रशांत नेटके

औसा : औसा तालुक्यात आगामी काळात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या शांततेत पार पडाव्या या अनुषंगाने किल्लारी पोलिसांतर्फे लामजना गावात पथसंचलन करण्यात आले. निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडाव्यात याबाबत किल्लारी पोलिस दलाच्या वतीने सूचना देण्यात आल्या.
यावेळी किल्लारी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद म्हेत्रेवार ,पो.उप.निरीक्षक अमोल गुंडे ,बिट अंमलदार सचिन उस्तूर्गे,गौतम भोळे,गणेश यादव ,आबासाहेब इंगळे यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार, होमगार्ड हे लाठी,रायफल, हेल्मेट सह सज्ज होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button