Dewala

खामखेडा येथील सुळे डाव्या कालव्याच्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी भूसंपादन झालेल्या जमिनीच्या मोबादल्यासाठी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

खामखेडा येथील सुळे डाव्या कालव्याच्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी भूसंपादन झालेल्या जमिनीच्या मोबादल्यासाठी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

देवळा तालुका महेश शिरोरे।

देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बागायती क्षेत्रातून सुळे डावा कालवा पुनद प्रकल्पाचे काम होऊन ,शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन होऊनही अद्याप मोबदला मिळाला नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना ए पी आय अध्यक्ष कैलास पगारे व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

खामखेडा येथील सुळे डावा कालवा पुनद प्रकल्पाचे २०१५ सालापासून काम पूर्ण झाले असून नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी श्रावण बोरसे, मोठाभाऊ नंदाळे, म्हाळसाबाई पानपाटील, भाऊसाहेब शिरसाठ, यांनी दि.२/१/२०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून, मुख्य कार्यकारी अभियंता, तापी खोरे प्रकल्प विभाग नाशिक, मा जिल्हाधिकारी नाशिक, यांनी संबंधित प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून दोन महिन्यांच्या आत प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीच्या झालेल्या सर्व नुकसानीच्या आजपर्यंत झालेल्या रकमेच्या व्याजासह मोबदला देऊ असे लेखी आश्वासन देऊनही, आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला तर दिलाच दिला नाही पण मात्र ,शेतकऱ्यांच्या नशिबाची थट्टाच चांगल्या प्रकारे केली असल्याचा प्रत्यय मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आला आहे. या उडवाउडवीच्या आश्वासनानमुळेच पुनःच एकदा संतप्त शेतकऱ्यांनी काल मा जिल्हाधिकारी साहेबाना तक्रारी निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून हा प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी संबंधित पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. तात्काळ मोबदला दया, हा प्रश्न पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर येता कामा नये, असे सांगितले, यावेळी सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मा सूरज मांढरे, व उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांचे शतशः आभार मानले खरे पण आता या प्रकल्पग्रस्त शेतकयांच्या हाकेला व जिल्हाधिकारी साहेबाच्या शब्दाला आता पाटबंधारे विभागाचे अधिकारी किती किंमत देतात हाच विषय कुतूहलाचा ठरणार आहे. यावेळी ए पी आय महाराष्ट्र अध्यक्ष कैलास पगारे, श्रावण बोरसे, दादाजी बोरसे, मोठाभाऊ नंदाळे, भाऊसाहेब शिरसाठ, भाऊसाहेब मोरे, चिंतामण गवळी, दत्तू मोरे, दादाजी शेवाळे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

खामखेडा येथील सुळे डावा कालव्यात जाणाऱ्या शेतकयांच्या जमिनीचा फेरमोजणी आमच्या विभागा कडे आलेली असून एक ते दोन दिवसात त्याचा प्रस्ताव तयार होऊन तो प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर होऊन , मोबदल्याच्या रकमेसाठी बैठक आयोजित केली जाईल व मोबदला ठरल्यानन्तर एक ते दोन महिन्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱयांना त्यांच्या नुकसानीचा मोबदला दिला जाईल.

आर एम पवार उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग कळवण

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button