Jalgaon

Jalgaon Live: साडे सहा वर्षीय शिवांगी काळे बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित..! प्रसंगावधान राखत आईचे वाचविले प्राण..!

Jalgaon Live: साडे सहा वर्षीय शिवांगी काळे बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित..! प्रसंगावधान राखत आईचे वाचविले प्राण..!

आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून मोठे धाडस करत साडेसहा वर्षीय चिमुकल्‍या मुलीने आईचे प्राण वाचविले. तिच्‍या या हिंमतीची दखल म्‍हणून आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने (PM Bal Shakti Award) गौरविण्यात आले.
जळगावातील शिवांगी काळे असे या चिमुकलीचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. यात शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.
तिने राखले प्रसांगवधान

साधारण वर्षभरापुर्वी म्‍हणजे ५ जानेवारी २०२१ रोजी घटना घडली. त्‍यावेळी शिवांगी ही पाच वर्षाची होती. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना हिटरचा शॉक लागला. यानंतर त्‍या जोराने ओरडल्‍या. घरात शिवांगी ही तिच्‍या दोन वर्षाच्या लहान बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button