Jalgaon

जळगाव Live: येत्या दोन दिवसांत पुन्हा पाऊस..!गारपीट सह मुसळधार पावसाची शक्यता..!

जळगाव Live: येत्या दोन दिवसांत पुन्हा पाऊस..!गारपीट सह मुसळधार पावसाची शक्यता..!

जळगाव एकीकडे थंडीचा जोर वाढलेला असतानाच राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील २२ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या शनिवार रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वि

शेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने शनिवारी 22 जानेवारी रोजी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.
तर 23 जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button