India

?आजपासून सर्व राज्यांत करोना लसीचा ‘ड्राय रन’..!काय आहे ड्राय रन..? ड्राय रन ह्या चार जिल्ह्यात केली जाईल..!

?आजपासून सर्व राज्यांत करोना लसीचा ‘ड्राय रन’..!काय आहे ड्राय रन..?

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आजपासून कोरोना लसीचा ‘ड्राय रन’ म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे.

सरकारने आत्तापर्यंत 83 कोटी सीरिंज खरेदी केल्या असून 2 जाने पासून संपूर्ण देशात लसीकरणाचा ड्राय रन केला जाणार आहे.

दरम्यान याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये आत्तापर्यंत ड्राय रन पार पडला आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत.

आता दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने २ जानेवारी रोजी सर्व राज्यांमध्ये करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांध्ये आज (2 जानेवारी) कोरोना लसची ‘ड्राय रन’ केली जाणार आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून कोरोना लसीचं ड्राय रन पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांध्ये 2 जानेवारीला होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणासाठी 3 केंद्र असतील आणि प्रत्येक केंद्रावर 25 जणांना लस देण्यासाठी निवडलं जाईल.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

काय आहे ड्राय रन .?

ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची सराव फेरी आहे. यानिमित्ताने डॉक्टर्स, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी कितपत तयार आहेत, हे तपासले जाईल. त्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये यंत्रणा उभारण्यात येतील. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी सर्वप्रथम लसीकरणाला सुरुवात होईल. ड्राय रनमध्ये एकप्रकारे लसीकरण प्रक्रियेचा सराव केला जाईल.

ट्रायल रन आणि ड्राय रनमधील फरक?

कोरोना लसीकरणाच्या ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये मोठा फरक आहे. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडली. यावेळी संबंधित स्वयंसेवकांना कोरोनाची लस प्रत्यक्षात देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना 28 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. 28 दिवस झाल्यावर स्वयंसेवकांना पुन्हा एक डोस दिला जातो. याउलट ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लस दिली जात नाही.हे महत्त्वाचे आहे.

ह्या जिल्ह्यात जय्यत तयारी..

पुणे जिल्ह्य़ातील तीन ठिकाणी करोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येईल. सकाळी नऊ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही सराव फेरी होईल.

नागपुरात तीन ठिकाणी ड्राय रनची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 25 लोक ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना प्रत्यक्षात लस दिली जाणार नाही. तर लसीकरणाची सराव चाचणी पार पडेल.

शहारी भागात डागा हॉस्पिटल आणि के टी नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ग्रामीण भागात कामठी रुग्णालय येथे ड्राय रन पार पडेल. प्रत्येक केंद्रावर चार व्हॅक्सिनेशन अधिकारी उपस्थित असतील.

ड्राय रनच्या प्रक्रियेत सर्वप्रथम covid app मध्ये एन्ट्री केल्या जातील. लस दिल्यासारखे करतील. मग संबंधित स्वयंसेवकाला काहीवेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. जेणेकरुन त्याच्यावर लसीचे काही दुष्परिणाम होतात का, हे तपासता येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button