Jalgaon

Jalgaon: येत्या 24 तासात थंडीचा तडाखा..!

Jalgaon: येत्या 24 तासात थंडीचा तडाखा..!

राज्यात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहीर वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट झाल्याने थंडीच्या लाटेने राज्यातील इतर भागासह जळगाव गारठले आहे. रविवारी जळगाव शहर परिसरात राज्यातील सार्वधिक कमी ५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील ९ जिल्ह्यात पुढील २४ तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. तसेच दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहीर वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील थंडीची लाट कायम असून, रविवारी जळगाव शहर परिसरात तब्बल ११ वर्षांनंतर सर्वात नीचांकी ५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात हे सर्वात कमी तापमान ठरले. तर रविवारी दुपारचे तापमान ३३ अंशांपर्यंत वाढले हाेते. कमाल आणि किमान तापमानात २८ अंश सेल्सिअसचे अंतर असल्याने रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका अशी स्थिती हाेती.

दरम्यान, राज्यातील ९ जिल्ह्यात पुढील २४ तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील धूळे, नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button