Warora

अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याचे पालक मंत्री ना.विजय भाऊ.वडेट्टीवार यांनी दिले निर्देश

अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याचे पालक मंत्री ना.विजय भाऊ.वडेट्टीवार यांनी दिले निर्देश

छोटूभाई शेख यांनी सादर केले पालकमंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

वरोरा शहरातील हजारो गोरगरीब नागरिकांना जागेची लिज नसल्याने.घरकुल योजनेपासून हजारो लाभार्थी वंचित असून त्या सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व अतिक्रमण जागेचे पट्टे देण्यात यावे यासाठी वरोरा नगर पालिकेचे सार्वजनिक.बांधकाम सभापती छोटूभाई शेख यांनी राज्याचे नवनिर्वाचित पुनर्वसन ओबीसी विकास मदत कार्य मंत्री तथा पालक मंत्री.ना विजय भाऊ.वडेट्टीवार यांना निवेदन सादर करून मागणी केली असता संबंधित प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री ना.वड्डेटीवार यांनी दिले.

अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याचे पालक मंत्री ना.विजय भाऊ.वडेट्टीवार यांनी दिले निर्देश

वरोरा शहर हे अतिशय जुने शहर असून येथील नगरपरिषद ला 152 वर्ष पूर्ण झाले आहे . शहरात 30% नगर परिषद व महसूल विभागाच्या जागेवर मागील 50 ते 60 वर्षापासून तर आत्तापर्यंत नागरिक कच्चा. स्वरूपाचे घर बांधकाम करून राहत आहे. नगर परिषदने त्या परिसरात पूर्ण विकसित कामे नागरिकांना सुविधा मिळण्याकरिता केले असून सदर जमिनीचे प्लीज व पट्टा नसल्याने शहरातील मालवी प्रभाग, राजीव गांधी, प्रभाग कर्मवीर प्रभाग व शहरातील इतर सुद्धा प्रभागातील 2 हजाराच्या वर नागरिकांना आपल्या हक्काच्या प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व अतिक्रमण धारकांना प्लीज देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्याकरिता नगरपालिकेने 4 वेळ ठराव सुद्धा गेल्या 2 वर्षात मंजूर केलेले असून या. जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात लक्ष देऊन या प्रकरणाला मान्यता मिळण्याकरिता दि 17 जानेवारीला पालकमंत्री.ना विजय.भाऊ वडेट्टीवार यांना नगर पालिकेचे सार्वजनिक.बांधकाम सभापती तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार शेख.जैरुदीन छोटूभाई यांनी निवेदन सादर करून सदर जमिनीचे पट्टे मिळण्याची मागणी केली यावेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थित मा.जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणात तातडीने कारवाई करण्याकरता निर्देश दिले यावेळी उपस्थित निवेदन देताना छोटूभाई शेख , मेहबूब भाई, कमलेश बांबोडे, संदीप सोडम हरुण भाई व आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button