Chandwad

चांदवड येथे सावरकर यात्रेचे आयोजन

चांदवड येथे सावरकर यात्रेचे आयोजन

चांदवड उदय वायकोळे

चांदवड येथे दि 6/4/2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या सावरकर यात्रेची सुरुवात ही सायंकाळी चार वाजता गणूर चौफुली पासून होईल.यानंतर सोमवार पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यानंतर नगरपरिषद , शिंपी गल्ली ,वरचे गाव ,लोहार गल्ली ,शिवनेरी चौक ,श्रीराम रोड ते सोमवार पेठ मार्गे ही यात्रा परत बाजार तळा जवळील हनुमान मंदिराच्या ठिकाणी विसर्जित होईल.हनुमान मंदिराच्या ठिकाणी सायंकाळी ५-३० वाजता चांदवड येथील आबड लोढा जैन सुराणा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रा डॉ तुषार चांदवडकर दिग्दर्शित *गीत सावरकर नृत्य सावरकर* हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.यानंतर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर तुषार चांदवडकर यांचे सावरकरांचा माफीनामा वस्तुस्थिती आणि खोटारडेपणा या विषयावर व्याख्यान देतील. यानंतर चांदवड तालुक्यातील माजी फौजी बांधवांचा सत्कार करण्यात येईल.सावरकरण प्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी अधिकारी बंधू-भगिनींनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन चांदवड शहर व चांदवड तालुका भारतीय जनता पक्ष आणि आयोजक आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button