sawada

सावदा येथे ख्वाजानगर सह परिसरातील वीज खंडित होण्याचे प्रमाणात अधिक वाढ : जुनाट विद्युत वाहिन्या व पोल बदलून मिळावे – विरोधी गटनेते फिरोज खान पठाण

सावदा येथे ख्वाजानगर सह परिसरातील वीज खंडित होण्याचे प्रमाणात अधिक वाढ : जुनाट विद्युत वाहिन्या व पोल बदलून मिळावे – विरोधी गटनेते फिरोज खान पठाण

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे ख्वाजानगर सह विविध भागात बरेच वर्षापासून नियोजनशून्य पणे जास्तीचे अंतरावर विजेचे पोल लावल्याने त्यावरील लावलेल्या विद्युत वाहिन्या वादळी वाऱ्यामुळे वेळोवेळी खंडित होत राहतात यामुळे येथील परिसरामध्ये असलेल्या वीज ग्राहकांना वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

सदरील समस्याचा कायमस्वरूपी निवारण व्हावा याकरिता माझ्या नगर्स विविध भागातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे न.पा विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्याकडे आले असता त्यांनी नागरिकांची समस्या बघून ऐकून थेट सदरील परिसरात ग्राहकांची समस्या कायमची दूर व्हावी याकामी सविस्तर लेखी निवेदन दि.१५/७/२०२१ रोजी समक्ष भेटून कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कं मर्या.सावदा ता.रावेर यांना दिले होते. नंतर सदरील समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी म्हणून मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे शिफारस लेटर देखील सादर केले होते.

परंतु सावदा वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे की काय मात्र ख्वाजानगर सह परिसरातील नागरिक तथा वीजग्राहक यांची समस्या जैसे थे स्थितीमध्ये असल्याने पुन्हा कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कं. मर्या.सावदा यांची दि. २१ सप्टेंबर रोजी समस्याग्रस्त नागरिकांचं नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी समक्ष भेट घेऊन स्मरणपत्र दिले असून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केलेले आहे. यावेळी शहीद अब्दुल हमीद संस्थाचे शेख मुख्तार, फिरोज खान,राजा, समाज सेवक शेख बाबू,शेख अरबाज,अबू दानिश इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button