Ahamdanagar

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील केशवशिंगवे येथे शेतीसाठीच्या नवीन डीपीचे उद्घाटन

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील केशवशिंगवे येथे शेतीसाठीच्या नवीन डीपीचे उद्घाटन

सुनील नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील केशवशिंगवे येथे शेतीसाठीच्या नवीन डीपीचे उद्घाटन आणि दत्त मंदिर परिसरात एक कि.मी.अंतरावर पांदीच्या रस्त्यावर भराव,खडीकरण, व मजबुतीकरण करून पक्क्या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उर्जा, आदिवासी, नगरविकास मंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला.आणि हा नवीन रस्ता जनतेसाठी खुला करून देण्यात आला.यावेळी केशवशिंगवे गावचे आजी माजी सरपंच ,ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. नंतर शिराळ येथे क्रुषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी ट्रँक्टरचे वाटप करून नामदारांच्या हस्ते चाव्या सुपुर्त करण्यात आल्या. नंतर दुर्गा माता मंदिरात जनता दरबारात अनेक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नाठाळ सरकारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन जनतेची कामे वेळेवर करण्याच्या सुचना देण्यात आल्या.याप्रसंगी तहसीलदार शाम वाडकर,संभाजी पालवे,जगदीश सोलाट,डॉ. घोरपडे,अमोल वाघ,नारायण नजन,वसंत वाघमारे, राजुमामा तागड,शिंदे मँडम यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button