Mawal

मावळ तालुक्यात बिरसा क्रांती दल सभा उत्साहात साजरी

मावळ तालुक्यात बिरसा क्रांती दल सभा उत्साहात साजरी

मावळ / प्रतिनिधी – उमाकांत मदगे

बिरसा क्रांती दल मावळ तालुका सर्वसाधारण सभा तळपेवाडी येथे उत्साहात पार पडली. मावळचे माजी सभापती शंकरराव तळपे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.
सर्वप्रथम सर्वांचे शाब्दिक स्वागत करुन संघटणेची ध्येयधोरणे व संघटना स्थापण होणेमागची पार्श्वभुमि स्पष्ट करण्यात आली.
मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे मार्गदर्शन घेऊन संघटनेचा विस्तार करण्याचे ठरले सुपे मार्गदर्शन करुन संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मावळच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १५%निधी आदिवासी लोकांसाठी खर्च करावयाचा असतो प्रत्येक ग्रामपंचायत १५% निधि आदिवासीवर खर्च करते की नाही याचा आढावा माहीतीचा अधिकार वापरुन मिळवण्याचे सर्वानुमते ठरले.याची खडान् खडा माहीती टाकवे ग्रामपंचायतीतील हुशार व जानकार बिरसा क्रांती दल मावळ महासचिव उमाकांत मदगे, व अनिल कोकाटे या दोघांनी दिली त्या बद्दल दोन्ही मावळ्यांचे अभिनंदन करण्यात आले
जनगणना २०२१ मध्ये आदिवासी धर्माचा उल्लेख नसल्यास आदिवासींनी other हा पर्याय निवडावा कारण आदिवासींना कोणताही धर्म नाही याबाबत चर्चा होउन जनजागृती करण्याचे सर्वानुमते ठरले.

कर्जत भिमाशंकर रस्ता होण्यासाठी धरणे आंदोलनास पाठिंबा व आंदोलनात सहकार्य करण्याचे ठरले आदिवासींच्या जमीनी या रस्त्यामुळे विकल्या जात आहेत आदिवासींनी आपल्या जमिनी विकु नयेत असे आवाहन संघटनेकडून करण्यात येत आहे.व ज्यांच्या जमीनी कर्वेंच्या नावे आहेत त्यांनी प्रांत आॅफीसर कडे अपिल करावेत जमीन पुन्हा मिळण्यासाठी व सावकारी तुन कुळाला जमीन मिळण्यासाठी संघटना सहकार्य करेल अशाप्रकारे आदिवासींनी आंदोलनात जमिनींचा प्रश्न सोडवा तरच रस्ता चालू करा असा ही प्रयत्न व्हावा यासाठी आंदोलनात योग्य मागण्या मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करावे असे आवाहन संघटनेकडुन करण्यात येत आहे.

आपल्या भागातील शेतकर्‍यांनी पाणी परवाना काढूण घ्या असे आवाहन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.खामकर सर यांनी केले व त्याविषयी मार्गदर्शन केले.
या सभेस मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे, बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा संघटक मा. विक्रम हेमाडे, बिरसा क्रांती दल मावळ तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, तालुका सचिव हिरामण हेमाडे, मार्गदर्शक बजरंग लोहकरे, उपाध्यक्ष जालिंदर मेठल, उपाध्यक्ष लहु दगडे, प्रसिद्धीप्रमूख अमोल चिमटे, दशरथ आढारी, अनिल कोकाटे, उमाकांत मदगे, मधु कोकाटे, अरुण मोरमारे, बाळू मोरमारे, पै. अशोकराव सुपे, नाथा मोरमारे, बिरसा क्रांती दल मावळ उपाध्यक्ष कांताराम असवले, मावळ मुख्य संघटक अनिल गवारी आदि.मान्यवर उपस्थित होते
यावेळी उमाकांत मदगे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Back to top button