sawada

मरीमाता मंदिर व खाँजानगर गेट समोरील नाल्यात साचलेल्या घाणपाणी कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात !सावदा न,पा शहर स्वच्छता ठेवण्यात मागे नागरीकांत संताप

मरीमाता मंदिर व खाँजानगर गेट समोरील नाल्यात साचलेल्या घाणपाणी कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात !सावदा न,पा शहर स्वच्छता ठेवण्यात मागे नागरीकांत संताप

युसूफ शाहा सावदा

सावदा : सावदा दि. (सा वा) येथील शहरातील श्रध्दा स्थान असलेल्या मरीमाता मंदिर आणि खाँजानगर गेट समोरच्या नाल्यात कित्तेक दिवसापासून पाणी साचल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाला लेखी तोंडी तक्रारी देऊनही अद्यापही कारवाई शुन्य असल्याने आरोग्य विभागाचे प्रती व न पा विषयी याभागातील नगरसेविकेसह रहिवाशांमध्ये तिव्र स्वरूपात असंतोष खदखदत आहे. दरम्यान पालिकेने याबाबत तातडीने कृती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील मरीमाता मंदिर व खाँजानगर गेट समोरील नाल्यात अनेक दिवसा पासून ड्रोनेज चे पाणी साचल्याने पाण्याची अतिशय दुर्गंधी पसरत आहे. नाल्यालगत अनेक लहान लहान दुकाने, ठेल्यावर विक्रीसाठी फिरस्ती वाले तसेच तेथील वास्तव्यास असलेल्या जनतेला तेथील घाण बाधा ठरू पाहत असून, येथील पाण्याची अतिशय दुर्गंधी, भून भून करणारे मच्छरे यामुळे डायरिया, हिवतापाचा आजार होण्याचा संभव असल्याच्या तक्रारी आहेत.
या भागातील नागरिकांनी या संदर्भात अनेकदा न पा कडे तक्रारी केल्या आहेत. तरी याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत. याच भागात पुढिल महिन्यात चैत्र शुद्ध पौर्णिमेला मरीआईची यात्रा भरते. यात्रेनिमित्त असंख्य भाविकांची गर्दी होते. याच भागातून अनेक गावांमध्ये ये जा करताना येथूनच ये जा करताना दुर्गंधी मुळे घबराट निर्माण होते. साचलेल्या घाणपाणी कचर्‍यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे. तरी येथील प्रश्नांची तातडीने दखल घेऊन नाला साफ करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी आदेश द्यावेत अशी मागणी केली जात असून, सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करून, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button