India

Important: मोबाईलच्या खालच्या बाजूला का असते लहान होल..?हे फक्त डिझाइन नाही तर करते महत्वपूर्ण काम.. जाणून घ्या कारण..!

Important: मोबाईलच्या खालच्या बाजूला का असते लहान होल..?हे फक्त डिझाइन नाही तर करते महत्वपूर्ण काम.. जाणून घ्या कारण..!

आजकाल प्रत्येकाच्या हातात एक गोष्ट कायम असते ती म्हणजे स्मार्टफोन. प्रवास असो किंवा कामातून काढलेला ब्रेक प्रत्येक जण सतत स्मार्टफोनमध्ये व्यग्र असतो. यामागचे कारणही तसेच आहे. स्मार्टफोनमुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सहजरित्या एका क्लिकवर करता येतात. त्यामुळे प्रत्येक काम करण्यासाठी आपण स्मार्टफोनचा आधार घेतो. पण दिवसातला बराच वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणाऱ्या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बऱ्याच वेळा माहीत नसते. यातीलच एक गोष्ट म्हणजे बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला असणारा लहान होल.
बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला चार्जिंग कनेक्शन जोडण्याच्या शेजारी एक लहान होल असतो. बऱ्याच वेळा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण हा लहान होल फोनच्या डिझाईनचा भाग नसुन एका महत्त्वाच्या कारणासाठी त्या जागी असतो.
आपण जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा हा लहान होल महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा होल आपण फोनवर बोलत असताना आपल्या आजूबाजूला असणारा आवाज कॅन्सल करण्याचे काम करतो. म्हणजे जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा आपल्या आवाजासोबत आजूबाजूचा आवाज देखील समोरच्या व्यक्तीला ऐकू जाण्याची शक्यता असते. पण या लहान होलमुळे आपल्या व्यतिरिक्त दुसरा आवाज पोहचत नाही.
या होलला ‘नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोन’ म्हटले जाते. फोनवर बोलत असताना हे ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होते. तुम्ही खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी जरी असला तरी या नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोनमुळे आजूबाजूचा आवाज कॅन्सल होऊन फक्त तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत क्लिअर पोहोचण्यास मदत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button