India

Important: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक…जाणून घ्या कसं करते सिमकार्ड काम..!

Important: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक…जाणून घ्या कसं करते सिमकार्ड काम..!

• सगळी सिमकार्ड एका कोनातून कापलेली असतात. हे भारतातच नाही तर जगभरात अशीच सिमकार्ड मिळतात.
• जगभरात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या सिम कार्ड बनवितात. परंतू यापैकी एकही कंपनी आयताकृती सिमकार्ड का बनवत नाहीत.
• हीच सिमकार्ड सुरुवातीला आयताकृती असायची, मग नंतर का म्हणून बदलली.

आधुनिक काळात सर्वांच्याच हातात मोबाईल दिसतो.हल्ली मोबाईल वापरत नाही असा कुणीही व्यक्ती आढळून येणार नाही. मोबाईल संदर्भात अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेकांना माहीत नसतात.प्रत्येक मोबाईल मध्ये एक सिमकार्ड असते ज्यामुळे मोबाईल वर फोन येणे,फोन करणे शक्य होते. आपण किती तरी वेळा मोबाईल मधील सिमकार्ड काढतो,बदलतो..पण हा विचार कधी केलाय काकी सिमकार्ड एका बाजूला कट का केलेले असते..? चला तर मग जाणून घेऊ की सिमकार्ड हे एका बाजूला कापलेले का असते..?

सिम कार्ड जेंव्हा बनवले तेंव्हा ते चौकोनी होते लोकांना सिमची सरळ किंवा उलट बाजू कोणती हे समजणे कठीण झाले. यामुळे अनेक वेळा लोक मोबाईलमध्ये सिम उलटे ठेवत असत. नंतर ते काढणेही अवघड होते. काही वेळा सिमची चिप देखील खराब होत होती. यावर उपाय म्हणून कंपन्यांनी सिमचे डिझाईन बदलले. सिमकार्ड
कोपऱ्यातून कापल्याने लोकांचे कन्फ्यूजन दूर झाले आणि ते सिमकार्ड ट्रे मधून काढणे देखील सोपे झाले.

सिमकार्ड कसे काम करते…
मोबाईलमध्ये सिमकार्ड (SIM Card) हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module ) SIM चा फुलफॉर्म असा आहे. सिमकार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम चालवतं. या कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल
सबस्क्रायबर आयडेंटिटी (IMSI) सुरक्षितपणे साठवलेली असते. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर प्रत्येक सबस्क्रायबरला एक युनिक क्रमांक (Unique Number) मिळतो. IMSI आणि युनिक क्रमांकामुळे डिव्हाइसवरच्या युजरची ओळख पटते. 15 मिमी लांब, 25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जाडी अशा पद्धतीने
सिमकार्ड डिझाईन केलेलं दिसतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button