Nashik

मी ज्ञानी होणार परिक्षा बक्षीस वितरण कार्यक्रम २०२२एर॑डगाव ला उत्साहात संपन्न

मी ज्ञानी होणार परिक्षा बक्षीस वितरण कार्यक्रम २०२२एर॑डगाव ला उत्साहात संपन्न

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला ,ता.कळंब, जि.उस्मानाबाद
आयोजित मी ज्ञानी होणार बक्षीस वितरण कार्यक्रम येवला तालुक्यातील साताळी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक रमेशजी वाघ यांची प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे, सदस्य तुळशीराम भोये , ज्ञानदेव नवसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एरंडगाव तालुका येवला येथेअंजनी सूर्य लाॅन्स येथे संपन्न झाला.
राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला चे अध्यक्ष सचिन लांडगे यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे सदस्य ज्ञानदेव नवसरे यांनी मी ज्ञानी होणार या उपक्रमाची माहिती सांगितली.
नाशिक जिल्ह्यातील १५ शाळांतील विजेते विद्यार्थी, पालक व शिक्षक व मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्राध्यापक रमेश वाघ सर यांनी विद्यार्थ्यांना मी ज्ञानी होणार यासाठी मार्गदर्शक सूचना मांडल्या.
तंदुरूस्त व निरोगी शरीरासाठी व्यायाम, TV व मोबाईलचा शैक्षणिक वापर, वाचन व्यासंग, Good Things IN and Bad Things of Life should OUT तसेच वेध भविष्याचा याबद्दल विविध उदाहरणे आणि दाखल्यांसह विनोदी शैलीत मांडले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व वक्ते प्राध्यापक रमेश वाघ सर, कार्यक्रम अध्यक्ष वंदना नागपुरे ,संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे, सदस्य ज्ञानदेव नवसरे, तुळशीराम भोये तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते Integrate Classes Latur यांच्या सहकार्याने संस्थेला मिळालेले सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.वंदना नागपूरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मी ज्ञानी होणार उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रम सुत्रसंचालन पगार मॅडम यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन पारखे मॅडम यांनी केले.
पाहुण्यांचा सत्कार समारंभाची जबाबदारी जगन्नाथ आहेर, ऋषीकेश वाडेकर यांनी पार पाडली.
विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांना नाष्ट्याची सोय पवार सर व पगार मॅडम यांनी केली.
संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे सर यांनी अंजनीसुर्य ला्ृन्स चे संचालक श्री. दत्ताजी निकम यांनी कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button