Amboli

चक्रीवादळाने भिंत कोसळून ३ जन जखमी , १ मृत १ अती गंभीर, व्यापाराचे लाखोचे नुकसान.

चक्रीवादळाने भिंत कोसळून ३ जन जखमी , १ मृत १ अती गंभीर, व्यापाराचे लाखोचे नुकसान.

दोन शाळेचे छत उडाले

आंबोली बुधवारला सुमारे ४ वाजताच्या दरम्यान भिसीत चक्रीवादळने थैमान घातले . सोसाट्याचा वादळवाऱ्याने आणि पावसाने दयाल राईस मिलची ३० फुट उंचीची भिंत किराणा दुकान आणि हार्डवेअरच्या दुकानावर कोसळून ३ व्यापारी व १ नागरीक जखमी झाले त्यापैकी एकाला नागपूरला , शम्मीर हैदर शेख याला चिमूरला नेत असतानांच वाटेतच मृत पावला .मृतकाच्या पष्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी,आई व बराच मोठा आप्तपरिवार आहे . मेन रोड बाजार चौकात असलेल्या दयाल राईल मिलची सुरक्षा भिंत लगतच्या दुकानावर पडल्याने त्या व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले . प्रकाश पंचम मेश्राम हे गंभीर झाले असून दिनेश देशकर व अर्चना देशकर हे पती पत्नी किरकाळ जखमी झाले आहे . तसेच भिसी येथील आदर्श जनता विद्यालय तसेच म. गांधी विदयालय या शाळेंचे छत तसेच गावातील घरांवरील टिनाचे पत्रे उडालेले आहे . चक्रीवादळामुळे झाडे तुटल्याने गावातील विजपुरवठा खंडीत झालेली आहे . नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे . सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Back to top button