India

Health:उचकी लागता करा घरगुती उपाय

आरोग्याचा मुलमंत्र..उचकी लागता करा घरगुती उपाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो काही वेळेस ही उचकी थांबते तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो. उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. म्हणून उचकी थांबण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा.

टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.

काळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल

चॉकलेट पावडर:
उचकी लागल्यास एक चमचा चॉकलेट पावडर खावी. चॉकलेट पावडर खाल्ल्याने काही वेळात उचकी बंद होते.

आपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल.

साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.

लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.

वरील उपाय करुं सुद्धा जर उचकी लागायची थांबत नसेल तर त्वरित नजिकच्या वैद्याकडे जावे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमीओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button