India

Health..आरोग्यास फायदेशीर बेलफळ

Health..आरोग्यास फायदेशीर बेलफळ

आपल्याकडे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींना अधिक महत्व आहे. यामध्ये अनेक वनस्पतींचा समावेश केला जातो. हिरडा, कोरफड, हळद अशा अनेक घटकांचा वापर अनेक आजार बरे करण्यासाठी होतो. यातीलच एक महत्वाच्या घटक म्हणजे बेलपान होय. हो तुम्ही बरोबर ऐकले आहे. आपल्याला बेलपान म्हणजे केवळ त्याला महादेवाच्या पिंडीवर वाहिला जातो इतकच माहिती आहे. परंतु त्याहीपेक्षा बेलाचे अनेक औषधी फायदे आहेत, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. आज आपण ते पाहणार आहोत.

एका छोट्याशा बेलापासून आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून तर मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेल गुणकारी आहे. गर्मीच्या दिवसात रोज एका बेलाचे शरबत प्यायल्यास निरोगी राहणे शक्य आहे.

1) गॅस आणि पोटदुखीपासून आराम :
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ऑफिसमध्ये तासनतास बसून राहिल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या होणं ही सामान्य बाब झाली आहे. खासकरुन कमी वयाच्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ लागला आहे. तुम्हालाही ही समस्या असेल तर दररोज बेलाच्या फळाचा रस घ्यावा. याने तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.

2) मधुमेहासाठी फायदेशीर :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय फायदेशीर आहे. दिवसातून दोन वेळा बेलाच्या पानांचा रस पिल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य होऊ शकते. शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. कारण कौमारीन नावाचा घटक बेल फळामध्ये असल्यामुळे इन्सुलिन निर्माण करण्यासाठी बीटा पेशीला उत्तेजित करतो.

3) रक्त शुद्ध करण्यास मदत :
रक्त साफ नसल्याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यातून तुम्हाला सर्वात जास्त स्कीनच्या समस्या उद्भवतात. अशात बेलाचा रस आणि त्यात दोन थेंब मध मिश्रित करुन घ्यावे. याने तुम्हाला आराम मिळेल.

4) अतिसार विरोधी:
उन्हाळ्याच्या दिवसात अतिसार ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. किंवा कच्चे फळे खाल्यास अतिसार नियंत्रणामध्ये येतो. अर्धे पिकलेली फळ हे सर्वोत्तम मानले जाते परंतु संपूर्ण पिकलेली फळे किंवा अगदी फळाचा चूर्ण परिणामकारक परिणाम दर्शवितो.

बेल फळा चा उपयोग हा वैद्याच्या साल्याने करावा. बेल फळाच्या वापराने काही त्रासदायक लक्षणें दिसल्यास त्वरित वैद्यांना भेटा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button