sawada

गजानन हास्पिटल ची अज्ञात व्यक्तीनी केली  दगडफेक करून दवाखान्यात तोडफोड

गजानन हास्पिटल ची अज्ञात व्यक्तीनी केली दगडफेक करून दवाखान्यात तोडफोड

सावदा युसुफ शाह

सावदा शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या गजानन हास्पिटल्स मधे काही अज्ञात व्यक्तीनी आज ण दुपारी दगडफेक करून दवाखान्यात तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
दवाखान्यात लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात येथील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई केली आहे.
दैनंदिन प्रमाणे आज सकाळी रूग्णालयात उपचारासाठी ओपीडी सुरू झाली. सुमारे १० साडेदहा चे सुमारास शेख इम्रान शेख महमूद वय वर्षे ३० रिक्षाचालक याला त्याचे शेखपुरा भागातील राहत्या घरात कोणत्यातरी विषारी प्राण्यांच्या चावल्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांनी प्राथमिक उपचारासाठी उपचारासाठी खिरोदा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी सावदा येथे डॉ सुनील चौधरी यांचे दवाखान्यात नेण्याचे सांगितलेवरून रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्यांचे ऋदय व फुफूस काम करत नसल्याचे प्रथम दर्शनी दिसले. डॉक्टरांनी लागलीच त्याला पुढिल उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रूग्णाला घेऊनही गेलेत जळगाव येथे घेऊन जात असताना येथील पाताळगंगा पुलाच्याजवळ त्याचे निधन झाले. त्यावरुन मयताला परत घरी नेऊन शव पेटीत ठेवले असता. शवपेटीला घरात जमलेल्या मधील कोणाचा धक्का लागला त्यामुळे शवपेटीतिल प्रेत हालले यावरून एकच खळबळ उडाली की, हा तर जिवंत आहे. या गोंळातून काहीनी म्हटले की डॉक्टरांनी चांगले तपासणी करून औषधोपचार केले असते तर असे घडले नसते. या रोशाने
साडेअकराचे सुमारास काही ५/६ इसमांनी रूग्णालयावर दगडफेक करून दवाखान्यात घुसून तोडफोड केली. यात दवाखान्यातील काऊंटर खुर्च्या तावदाने काचेच्या वस्तूंची आदि सामानाची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.
याबाबत डॉ सुनील चौधरी यांचे भाऊ अनिल चौधरी यांनी या वेळी तोडफोड करणारेंना जाब विचारला असता त्यांनाही मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत टीव्हींची तोडफोड केली. यामुळे सर्वत्र घबराट पसरली काय झाले ते काही कळत नव्हते दरम्यान डॉ सुनील चौधरी यांनी तातडीने पोलीस ठाण्यात फोन करून सांगितले असता लगेच पोलीस रूग्णालयात दाखल झालेने मोठा अनर्थ टळला.पोलीसांनी चौकशी करून पंचनाम्याचे काम करत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल वाघ करीत आहेत.मयताचे पश्चात आई पत्नी दोन मुली व मुलगा असा परिवार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button