रावेर

विदयार्थी विकासासाठी वाक्चातुर्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

विदयार्थी विकासासाठी
वाक्चातुर्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

सुभाष भोसले-कोल्हापूर
गारगोटी येथे प्रथमच विदयार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी
वाक्चातुर्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन इयत्ता ५वी ते १२ वी मुलांसाठी करणेत आलेले आहे.
शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे की आजकाल मुलांचा बुध्द्यांक जरुर वाढलाय, मार्क्स चांगले पडतात पण त्यांचा संवाद हरवला आहे, नातेवाईक व मित्रमंडळी यांचेशी बोलताना नीट संभाषण होताना दिसत नाही. मुले एकल कोंडी व त-हेवाईक स्वभावाची बनत आहेत. एखाद्या छोट्या समारंभात किमान कौशल्य सोडाच, उभं राहून बोलावं अशी धीटाई लोप पावत आहे, किंबहुना वैचारिक विकास होताना दिसत नाही.

संभाषण कला ही जीवन जगताना अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. ही कला माणसं जोडायला शिकवते, व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास होतो, इच्छित ध्येयापर्यंत पोचण्यासाठी, अनेक संकटांवर व समस्यांवर मात करण्यासाठी कणखर व चिवट मानसिकता बनवते. अर्थात ही कला ज्याच्याजवळ आहे ती व्यक्ती सहजपणे हार मानत नाही, एकुणच काय तर ‘वाक्चातुर्य’ ही माणसाच्या सर्वांगिण विकासाची गुरुकिल्ली आहे.

प्रशिक्षणातील प्रमुख विषय*
अवधान सिध्दता
उत्तम वक्तृत्व (भाषण कला)उत्तम निवेदन/सुत्रसंचालन,
उत्तम संवाद कौशल्य,
उत्तम मुलाखत,चिंतन, मनन व मांडणी (अनुभव कथन),
कथाकथन या विषयांवर आधारित उत्तम मार्गदर्शन होणार असून विद्यार्थ्यांना कृतीतून बोलतं करण्याचा विशेष प्रयत्न असणार आहे. कारण वक्तृत्व कला सोबत असेल तर करिअरची बाजू भक्कम होते. तरी त्वरीत आपल्या पाल्याची नाव नोंदणी करावी.
प्रशिक्षण कालावधी तारीख व स्थळ ६ नोव्हेंबर रोजी सांगितली जाईल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button