Ahamdanagar

महाराष्ट्र पोलीस मित्रमंडळाच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी फिरोज सिकंदर पठाण यांची बहुमताने निवड..

महाराष्ट्र पोलीस मित्रमंडळाच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी फिरोज सिकंदर पठाण यांची बहुमताने निवड..

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील फिरोज सिकंदर पठाण यांची महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पोलीस मित्रमंडळाच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष नुरजहा बशिर शेख यांनी नुकतेच दिले आहे.पोलीस मित्र मंडळाच्या माध्यमातून गरज पडेल तेथे पोलिसांना सहकार्य करून तालुक्यातील संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पोलिसांना मदत केली जाईल. असे नवनिर्वाचित अध्यक्ष फिरोज पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अहमदनगर जिल्ह्याचे भाजपाचे खासदार सुजयदादा विखे यांनी या निवडीबद्दल विषेशपत्र पाठवून फिरोज पठाण यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button