रावेर

शासनाच्या विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा – ना. हरिभाऊ जावळे

शासनाच्या विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा – ना. हरिभाऊ जावळे

रावेर प्रतिनिधी-विलास ताठे
शासनाच्या विविध योजना या शेतक-यासाठी सुरू असून शेतक-यांनी आता गटशेती कडे वळून, कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. या साठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करत आहे. या साठीच ठिकठिकाणी प्रशिक्षण वर्ग, मेळावे, प्रदर्शन आश्या योजना राबवून शासनाच्या योजना या शेतक-यांना कश्या मिळतिल या साठी कार्यक्रम सूरू आहेत. आशी माहिती कृषी शिक्षण व संशोधन विकास परिषद उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे यांनी रावेर येथे दिली.
पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान नुसार रावेर सर्कल चे तिन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण येथील गर्ल्स हायस्कूल, जिमखाना हाॅल, रावेर कार्यक्रमाच्या समारोपात ना. हरिभाऊ जावळे बोलत होते.
पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत राज्यशासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्यावतीने शासनाकडून प्रमाणित केलेल्या प्रशिक्षकां कडून शेतक-यांना तिन दिवस मोफत प्रशिक्षण संपूर्ण राज्यात सुरू आहेत यात
शासनाच्या या अभियाना अंतर्गत शेती, शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी शेतकर्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी या साठी मार्गदर्शन केले जाते. या साठी महसुल मंडळ निहाय शेतक-यासाची आधि नोंदणी करण्यात येते रावेर मंडळाचे प्रशिक्षण संपन्न झाले. या बरोबरच पुढे या शेतक-यांचा होणारा जोड कार्यक्रम व वेळोवेळी होणा-या मिटिंग होईल. यात सहभागी झालेल्या शेतक-यांना सहभागा बद्दल प्रमाणपत्र व अन्य योजनांचा लाभ मिळेल
आज या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकर भाऊ महाजन, श्रीराम फाऊंडेशन अध्यक्ष श्रीराम दादा पाटील यांचे सह शेतकरी प्रतिनिधी, व मान्यवर उपस्थित होते. या वेळी पत्रकार दिलीप वैद्य यांनी प्रास्ताविक केले. उमेश बीषेन, पुणे ट्रेनर ग्रुप farming.. , मा.वैभव रहाणे, रावेर सर्कल समन्वयक
यशोदिप सुनील चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या वेळी उपस्थित सर्वच शेतक-यांनी मान्यवरांकडून व प्रशिक्षण देणारे यांचे कडून माहिती जाणून घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button