Chandwad

शैक्षणिक शुल्क न भरल्याने परीक्षा नाकारली,पालकांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

शैक्षणिक शुल्क न भरल्याने परीक्षा नाकारली,पालकांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरातील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम संस्था संचलित इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये शैक्षणिक शुल्क भरले नाही ते भरण्यासाठी मुदत मागितली म्हणून परीक्षा गृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडल्याची तक्रार पालकांनी चांदवड गटशिक्षणाधिकारी आर. एन. निकम यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात सर्वत्र बंद असल्याने अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विस्कटली आहे. अशात शाळा उघडण्यात आल्या असून श्री नेमिनाथ जैन संस्था संचलित इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये परीक्षा सत्र सुरू झाले आहे. ता. २१ रोजी सुरू असलेल्या परीक्षा सत्रातून शैक्षणिक शुल्क न भरलेल्या १४ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात येऊन दुसऱ्या वर्गात बसविण्यात येऊन परिक्षेपासून वंचीत ठेवण्यात आले.

सदर प्रकार विद्यार्थ्यांनी घरी येऊन पालकांना सांगितला तेव्हा पालक म्हणून विचारणा केली असता शुल्क न भरल्याने ही कारवाई केली असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचीत ठेवणारे शिक्षक यांनी हा प्रकार गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर मान्य केला आहे.

विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचीत ठेवणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी पालक म्हणून शांताराम घुले, अरुण शेळके यांनी तसेच प्रहार संघटनेचे सोमनाथ जाधव, गणेश निंबाळकर यांनी गटशिक्षणाधिकारी आर. एन. निकम, पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्याकडे केली आहे.
दरम्यान ता. २१ रोजी झालेल्या या गोंधळात १४ विद्यार्थ्यांना चालू पेपर वरून उठवून परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे तक्रार करण्यास मात्र अवघे दोनचं पालक पूढे आले आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण संस्थेच्या हातात असल्याने भीतीपोटी इतर पालक पुढे आले नसल्याची कुजबुज शहरात आहे. मात्र संस्थेची ही दांडगाई किती सहन करावी या चिंतेत पालक आहे. मात्र शेवटच्या दिवशी पेपर घेऊन सारवा-सारव करण्याचा केविलवाणा प्रकार संस्था आता करणार असले तरी ‘त्या’ दिवशी बालमनांवर झालेल्या खोल जखमा कोण भरून काढणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
हे प्रकरण राज्यमंत्र्याकडे गेल्याची माहिती दरम्यान घडला प्रकार अतिशय गंभिर असल्याचे लक्षात येताच प्रहार जिल्हाउपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी हा प्रकार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर टाकताच त्यांनी तात्काळ नाशिकच्या शिक्षण उपसंचालकाना चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button