Rawer

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न.

निंभोरा येथे राष्ट्रवादी युवक तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांची केळी तुला.
एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न.
निंभोरा ग्रामस्थांना सरपंच सचिन महाले यांच्याकडून मोफत टँकर.
ऍड रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते वृक्षारोपण.

निंभोरा-संदिप को ळी

येथील कृषी तंत्र विद्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त पं स सदस्य दीपक पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ अरुणदादा पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्षा ऍड रोहिणी खडसे,राष्ट्रवादी किसान सभा अध्यक्ष सोपान पाटील,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,माफदा चे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,प्रदीप साळुंखे, पं स सदस्य दीपक पाटील,राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले,जीवन बोरनारे, कार्याध्यक्ष मयूर पाटील,शेख असलम आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या रुमाल,टोपी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी तर सूत्र संचालन हर्षल ठाकरे,वाय डी पाटील यांनी केले .आभार विवेक बोंडे यांनी मानले. सदर कार्यक्रमास माजी सरपंच डिगंबर चौधरी,सरपंच सचिन महाले,उपसरपंच रंजना पाटील,भास्कर महाले,माजी पं स सदस्य प्रमोद रझोतकर,ग्रा पं सदस्य चंद्रकांत खाचणे,शेख दिलशाद,मनोहर तायडे,संगीता राणे,मंदाकिनी ब-हाटे,सायराबी युनूस खान,राष्ट्रवादी महिला तालुका सरचिटणीस नंदिनी पंत ,विवेक बोंडे,गिरीश भावसार,धनराज बावस्कर,ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे,दिलीप सोनवणे, आशिष बोरसे,यांसह गुणवंत भंगाळे,शेख नदीम,नवाज पिंजारी,किरण कोंडे, राज खाटीक,चेतन बोरनारे आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान करण्यात आला.
माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांची केळी तुला-
उद्या दि.०५सप्टेंबर रोजी माफदा चे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ यांची कृषी तंत्र विद्यालयातर्फे प्रल्हाद बोंडे यांनी वाढदिवसानिमित्त केळी तुला करण्यात आली.
राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश-
येथील माजी सैनिक कन्या आशा सोनवणे यांच्या सह बबलू कोळी,पंकज कोळी,रितेश महाले,अनिल महाले आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला याईली ऍड रोहिणी खडसे यांनी त्यांचे स्वागत केले.
“हिम्मतबाज नाथाभाऊ” पुस्तकाचे प्रकाशन-
यावेळी संपादक भास्कर महाले यांच्या योद्धा नाथाभाऊ या अंकाचे वाढदिवसानिमित्त प्रकाशन करण्यात आले.
झाड माझ्या नाथाभाऊंच अंतर्गत वृक्षारोपण-
राष्ट्रवादी ओबीसी विभागाची संकल्पना असलेल्या “झाड माझ्या नाथाभाऊंच” या अभियानांतर्गत ऍड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते कृषी विद्यालयाजवळ वृक्षारोपण करण्यात आले.एकनाथराव खडसे यांच्या ६९व्या वाढदिवस सप्ताहानिमित्त हे वृक्षारोपण विविध गावांत सुरू आहे .
सरपंच सचिन महाले याव्हा कडून निंभोरा वासीयांना मोफत टँकर-
ऍड रोहिणी खडसे व माजी आ अरुणदादा पाटील यांच्या हस्ते पूजन करून निंभोरा सरपंच सचिन महाले यांच्या तर्फे ग्रामस्थांसाठी मोफत टँकर उपलब्ध करून देण्यात आले त्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button