Surgana

समर्थ प्ले स्कूल मध्ये अवतरले इको फ्रेंडली गणराज चे केले स्वागत

समर्थ प्ले स्कूल मध्ये अवतरले इको फ्रेंडली गणराज चे केले स्वागत

विजय कानडे

सुरगाणा येथील समर्थ प्ले स्कूल मध्ये बुध्दीचा देवता गणरायाची मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली स्कूल संचालिका सौ नयना कानडे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पुरोगामी व सुधारणावादी विचाराचा वारसा जपत या वर्षी संचालिका सौ नयना कानडे यांनी संपूर्ण शिक्षकांना
आणि विध्यार्थी यांना प्रोत्सहित केले.या वेळी पालक व विद्यार्थी यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले समर्थ प्ले स्कूल च्या विध्यार्थी यांनी सुबक गणेश मूर्ती बनवल्या,तर काहींनी गणरायाची विविध रूपे चित्राच्या माध्यमातून साकरल्याची माहिती प्राचार्य नयना कानडे यांनी दिली विविध वस्तूच्या साहाय्याने आकर्षण सजावट करण्यात आली या कामी सांस्कृतीक कार्यक्रम विभाग प्रमुख ठाकरे मॅडम, गीतांजली कानडे मॅडम,भोये मॅडम आदींनी परिश्रम घेतले. गणपती बाप्पा मोरया

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button