Ahamdanagar

सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराची आत्महत्या ?

सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराची आत्महत्या ?

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील मुख्य डॉक्टर गणेश गोवर्धन शेळके वय(४०)वर्षे रा.बहिरवाडी,ता. नेवासा,जिल्हा अहमदनगर.यांनी करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड १९चे लसीकरण चालू असताना भर दुपारी एक वाजन्याच्या सुमारास परिचारिका सारिका वैद्य आणि ईतर कर्मचाऱ्यांना उद्देशून मला कोरा कागद द्या,माझा टँब जमा करा,मला माझ्या नोकरीचा राजिनामा द्यायचा आहे असे म्हणत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या एका खोलीत जाउन खोलीचा दरवाजा आतुन बंद करून छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्या अगोदर त्यांनी एक सुसाईड नोट्स लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी पाथर्डी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे,पाथर्डीचे तहसीलदार, कलेक्टर व प्रशासकिय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले होते. वेळेवर पेमेंट न करणे,अतिरिक्त कामाचा भार टाकणे,पेमेंट कपात करण्याच्या धमक्या देणे. ईत्यादी बाबींचा उल्लेख शेवटच्या चिठ्ठीत केला होता.डॉ गणेश शेळके हे कामावर हजर झाल्यानंतर त्यांना तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून घेतलं गेल होतं आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करीत त्यांना धमकावून आत्महत्येस प्रव्रुत्त करण्यात आले होते. ते तिसगावाहुन आले त्यवेळी प्रचंड तणावाखाली दिसत होते असे परीचारीकेने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे,तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर होडशिळ व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात म्रुत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कौशल्य वाघ,पो.काँ.अरविंद चव्हाण, सतिश खोमणे,भाउसाहेब तांबे हे करीत आहेत.चिठ्ठीत नावे लीहुन ठेवलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button