Walchandnagar

तहसीलदार व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांच्या तर्फे १०० गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

तहसीलदार व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांच्या तर्फे १०० गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वालचंदनगर: (इंदापूर तालुका )रत्नपुरी व वालचंदनगर येथील परिसरातील १०० किट वाटप करण्यात आले इंदापूर तालुकाचे तहसीलदार सोनाली मेटकरी व वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार ह्या दोन अधिकारी कडून अडचणीतच्या काळात सर्वसामान्यां दिलासा देणारा उपक्रम राबवून अधिकारी व जनता यांचे नाते जपले. संयुक्तरीत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर शेजारी असलेल्या रत्नपुरी येथील काॅलनीतल्या ५० व वालचंदनगर मेन काॅलनी ५० गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू वाटप केले यावेळी वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे अधिकारी आनंद नगरकर यांच्या शुभहस्ते सोशियल डिस्टिंक्शनचे पालन करत केले.यावेळी नगरकर बोलताना म्हणाले कोरोना आजाराला न घाबरता प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार ,याच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी वालचंदनगर कंपनीचे सुरक्षा विभाग अधिकारी शैलेश फडतरे, वालचंदनगर ग्रामपंचायत उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड,वालचंदनगर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे,कालिदास राऊत ,महेश सोलंकी,संजय सोलंकी ,पोलीस अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button