Walchandnagar

पत्रकार प्रतापसिंह राजपूत यांचा सन्मान

पत्रकार प्रतापसिंह राजपूत यांचा सन्मान

अमोल राजपूत

वालचंदनगर: येथील पत्रकार प्रतापसिंह राजपूत यांच्या राजपूत समाजाबाबत केलेल्या सामाजिक कार्याची व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे जिल्हा राजपूत सेवा संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विकाससिंह हजारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, युवकयुवती परिचय स्मरणिका व पुष्पहार देऊन पुण्यातील एका सामाजिक कार्यक्रमात सन्मानित करण्यात आल्याने तरुणांना व समाजाला कार्याची प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी महाराणा राजपूत सेवा संघ पुणे जिल्ह्य सहसचिव ,माजी पोलिस उपनिरिक्षक दिपकसिंग गहेरवार ,कार्यकारणी मंडळ जगपालसिंह गहेरवार , श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगर चे अध्यक्ष रमेश देशपांडे,उमेश सगरे , राजपूत करणी सेना पुणे जिल्ह्य महिला उपाध्यक्ष उषा परदेशी ,अक्कलकोट तालुका बोरगांव प्रगतीशील बायगायतदार छन्नसिगं राजपूत, मुंबई बोरिवली व्यापारी राजेंद्र ठाकुर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष हजारे यांनी प्रतापसिंह राजपूत बद्दल बोलताना सांगितले की वालचंदनगरातील एक धाडशी व सामाजिक कार्यात सतत क्रियाशील व सातत्यपूर्ण अभ्यासु व्यक्तीमत्व असणारे राजपूत पत्रकारित्याबरोबरच सोशल मिडियातदेखील खबर सबसे तेज वालचंदनगर ग्रुपच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षे सडेतोडपणे लेखन करण्यात सतत सक्रिय राहत समाजसेवा करीत आहेत.

ते धार्मिक कार्यातदेखील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगरचे सचिवपदी राहून सामाजिक कार्यात सहभागी राहिले आहेत. अशी त्यांची ओळख असल्याने यंदा सन्मान सत्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button