Surgana

कठोर परिश्रमामुळे खोखो अल्टिमेट स्पर्धेत सुरगाण्याचा दिलिप खांडवी चमकला कॉ जे पी गावीत

कठोर परिश्रमामुळे खोखो अल्टिमेट स्पर्धेत सुरगाण्याचा दिलिप खांडवी चमकला कॉ जे पी गावीत

विजय कानडे
दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या खोखो अल्टिमेट लीग स्पर्धेत ओडिसा संघाकडून खेळत असलेल्या आणि सुरगाणा तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण. या कॉ जे पी गावीत यांच्या शिक्षण संस्थेत, श. भ. माध्यमिक विद्यालय आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण येथे विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या, संस्थेतील आदर्श खोखो खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी विद्यार्थी दिलिप खांडवी याने खोखो अल्टिमेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओडिसा संघाकडून उत्कृष्ठ बचावाचा खेळ करीत पन्नास हजार रुपये मिळवित सामनावीर पुरस्कार प्राप्त केला,आणि ओडिसा संघाला दणक्यात विजय मिळवून दिला.
१४ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील दिलीप खांडवी याने सतत चमकदार कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेचे दोन वेळा उत्कृष्ठ बचाव म्हणून सामन्यात सामनावीर बक्षीस मिळविले, आजच्या अंतिम सामन्यातहि त्याने उत्कृष्ठ बचाव हा पुरस्कार मिळवून आपली छाप पाडली. आणि सामना जिंकून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
सुरगाणा तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबातील दिलीप, परिस्थितीवर मात करीत, शालेय शिक्षण घेत घेत तो खोखोचे धडे सातत्याने गिरवीत राहिला. माध्यमिक विद्यालयात शिकतांना क्रीडाशिक्षक श्री आर डी चौधरी सर कसून सराव करुण घेतला, त्यातूनच त्याला खोखो ची गोडी लागली, आणि तो खोखो मध्ये रमला, त्यानंतर उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण येथे विज्ञान शाखेत शिकत असताना श्री लांडगे सर आणि श्री गांगुर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अलंगुण च्या मैदानावर आपल्या खेळाडू सहकर्यांबरोबर पहाट, सकाळ आणि संध्याकाळ तो मेहनत घेत राहिला, दोन वर्ष सातत्याने खोखो खेळाचा सराव सुरू ठेवला, कठोर परिश्रम, मेहनती, शांत, संयमी, प्रामाणिक, जिद्दी, मेहनती दीलीपने बघता बघता १७ आणि १९ वर्ष वयोगट खोखो स्पर्धेत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाचा ठसा उमटविला, शालेय स्पर्धेत, खोखो असोसिएशन स्पर्धेत आणि आदिवासीं विकास विभागाच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच अव्वल खेळ करीत राष्ट्रीय खेळाडू म्हणून यशस्वी झाला, याच खोखो तील यशाच्या जोरावर त्यांची नावाजलेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली, त्याची चमकदार कामगिरी पाहता तो महाराष्ट्र संघाचा कर्णधार झाला आणि महाराष्ट्र संघाची यशस्वी कामगीरी पार पाडत खेलो इंडिया स्पर्धेतही यश संपादन केले.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेला पण त्याने आपल्या खेळावर असलेला विश्वास आणि श्रद्धा , कठोर परिश्रम घेण्याची जिद्द आणि यशाचा पाठलाग करण्याची तळमळ सोडली नाही, हीच तळमळ त्याला अंतीम धेय्याकडे घेऊन गेली.
गेल्या काही महिन्यापूर्वी दिलिप खांडवी याला ओडिसा संघाने पाच लक्ष बोलीवर संघात घेतले, आणि पुणे येथील बालेवाडी मध्ये झालेल्या खोखो अल्टिमेट स्पर्धेत दिलिप खांडवी याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली, जिद्दीने खेळ करीत प्रत्येक सामन्यात उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर तो या स्पर्धेत चमकला. *”छोटा बवाल, बडा धमाका” अशी ओळख निर्माण झालेला दिलीप भल्याभल्यांना चकवत, आदर्श खेळ खेळत राहिला आणि असंख्य शाळकरी विद्यार्थी आणि युवकांच्या गळ्यातील ताईत बनला
आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरगाणा तालुक्यातील, ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील एक सर्वसाधारण मुलगा खेळाच्या जोरावर नावलौकिक मिळवित आहे. याचा अभिमान आम्हा सुरगाणा तालुक्याला तर आहेच, परंतू आमच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण या शिक्षण संस्थेचे नावही आज त्याने संबंध महाराष्ट्रात आणि देशात पोहचले आहे याचा आम्हा संस्थेला येथील त्याच्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना, विध्यार्थ्यांना त्याचा सार्थ अभीमान आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button