Sangali

महामानव बिरसा मुंडा यांना भारतरत्न द्या – जागतिक आदिवासी दिनानिमीत्ताने मागणी

महामानव बिरसा मुंडा यांना भारतरत्न द्या – जागतिक आदिवासी दिनानिमीत्ताने मागणी

सांगली – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

महामानव भगवान बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी ९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमीत्ताने बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी केली.
९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिन पलूस येथे साजरा करण्यात आला. प्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यावेळी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पलुस तालुका अध्यक्ष पुनाजी साबळे, कैलास मडके, गुलाब भोईर, वसंत भोये, दिनेश खाडे, छोटू अहिरे, एस. एम. ठाकरे, नारायण आढारी, अंबादास गवळी, रंगनाथ बंगाल, विश्वनाथ वाळकोळी उपस्तित होते.
जागतिक आदिवासी दिन हा देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो या दिवशी मोठ्या प्रमाणात राँली, प्रबोधन मेळावे, स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते पण या वर्षी कोरोना या साथीमुळे हा जागतिक आदिवासी दिवस हा शांततेत पार पाडला आहे.
आदिवासी समाज निसर्गावर अवलबून आहे. आदिवासी बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, देवदेवता, रूढीपंरपंरा या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे आदिवासी समाजाच या निसर्गांचे संतुलन ठेवू शकतो तो निसर्गाला देव मानतो. शिक्षणामुळे आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येत आहे. महामानव बिरसा मुंडा तसेच आद्यक्रातिवीर राघोजी भांगरे यांचा अशा अनेक आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास आता समाजाला समजू लागला आहे त्यामुळे तरूण मुले मोठी माणसं हे आदिवासी समाजासाठी एकजुटीने पुढे येत आहेत पिढ्यान् पिढ्या हा आदिवासी समाज डोंगरदऱ्यांमध्ये राहत असल्यामुळे सोयीसुविधांपासून वंचित राहिला आहे त्यामुळे आता आदिवासी समाजाचे प्रबोधन करून त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देणे गरजेचे वाटत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो समाज कधी कधीच इतिहास घडू शकत नाही त्यामुळे आदिवासी लोक आता इतिहासाची पाने वेळ वाचू लागला आहे राघोजी भांगरे त्यांना ठाणे जेलमध्ये फाशी देण्यात आली. तसेच तंट्या मामा भिल, राणी दुर्गावती, नाग्या कातकरी अशा अनेक क्रांतिकारक आदिवासी समाजामध्ये होऊन गेले आहेत. आणि त्यामध्ये डॉक्टर गोविंद गारे तसेच घटना समितीचे सदस्य जयपाल मुंडा यांनी लेखणीच्या जोरावर आदिवासी यांचे संरक्षण केले आहे त्यामुळे आता या आदिवासी समाजाला त्याच्या इतिहासात सजमून घ्यावा लागणार आहे असे मत दिलीप आंबवणे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button