Ahamdanagar

? Crime Dairy शिरूर येथील सोनाराचा खून करून भातकुडगाव येथे पुरला म्रुतदेह,दोन आरोपींना अटक एक फरार ?

? Crime Dairy शिरूर येथील सोनाराचा खून करून भातकुडगाव येथे पुरला म्रुतदेह,दोन आरोपींना अटक एक फरार ?
सुनिल नजन अहमदनगर
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शिरूर कासार येथील सोनार विशाल सुभाष कुलथे वय (२५)वर्षे याचा धारदार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी म्रुतदेह अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव शिवारातील गट नं.४२९/१/१ मधिल दत्तात्रय हरीभाऊ गायकवाड यांच्या शेतात खोल खड्डा खोदून पुरून टाकण्यात आला होता. या बाबदची माहिती अशी की भातकुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शिरूर कासार येथे केशकर्तनालयाचे दुकान आहे. गुरुवार दिनांक २० मे २०२१ या दिवशी सोनार विशाल कुलथे यांच्याशी संपर्क साधून माझे लाँकडाउनच्या काळात लग्न झाले आहे.मला जरा जास्त सोने खरेदी करावयाचे आहे. असे सांगत सोन्याच्या दुकानात तयार असलेले सोन्याचे दागिने घेऊन केशकर्तनालयाच्या दुकानात येन्याचे सांगितले.त्याप्रमाणे सोनार, विशाल कुलथे यांनी तयार सोन्याचे दागिने घेऊन सलुनचे दुकान गाठले.आणि ते सोने पाहुन या सोनाराचा याच ठिकाणी काटा काढण्यात आला. सोनार सुभाष कुलथे घरी न आल्यामुळे या बाबतीत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२१ भारतीय दंडविधान संहिता कलम ३६५,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून गायकवाड याचा मित्र केतन लोमटे याला ताब्यात घेऊन विचारले असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उतरे दिली पण पोलीसी खाक्या दाखवताच तो पोपटाप्रमाणे बोलू लागला. आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन ज्या ठिकाणी म्रुतदेह पुरला होता ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव शिवारातील ते ठिकाण दाखवले.शेवगाव आणि शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आणि पुरावा करण्यासाठी पुरलेला म्रुतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी साठी सरकारी दवाखान्यात पाठवून दिला.आरोपी केतन लोमटे आणि शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार झाल्याचे तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button