India

?Crime Diary.. हाथसर येथील बलात्कार झालेल्या दलीत युवतीचा दुर्दैवी मृत्यू… 14 दिवसांची मृत्यू शी झुंज अपयशी…देश की बेटी आजभी असुरक्षित…

?Crime Diary.. हाथसर येथील बलात्कार झालेल्या दलीत युवतीचा दुर्दैवी मृत्यू… 14 दिवसांची मृत्यू शी झुंज अपयशी…

देश की बेटी आजभी असुरक्षित…

नवी दिल्ली: मंगळवारी हाथरस सामूहिक बलात्काराच्या पीडितेचा मृत्यू झाला असून याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देश तसेच सरकारसाठी ही गोष्ट लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे तसेच दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात चार जणांनी बलात्कार केल्याच्या 14 व्या दिवशी मंगळवारी पहाटे दिल्लीतील एका रुग्णालयात दलित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारयाने दिली आहे.

“हाथरस पीडितेचा मृत्यू संपूर्ण समाज, देश तसेच सर्व सरकारी यंत्रणे साठी लज्जास्पद आहे. हे अत्यंत वाईट आहे की बर्‍याच मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत आणि आम्ही त्यांचे संरक्षण करू शकत नाही. दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी,असे केजरीवाल यांनी हिंदीमध्ये ट्विट केले आहे.

?Crime Diary.. हाथसर येथील बलात्कार झालेल्या दलीत युवतीचा दुर्दैवी मृत्यू... 14 दिवसांची मृत्यू शी झुंज अपयशी...देश की बेटी आजभी असुरक्षित...

दरम्यान १४ सप्टेंबर रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला एएमयूच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि अलीगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिने झटापट करत विरोध केला म्हणून आरोपीने तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता.ह्या सर्व झुंजीत तिची जीभ कापली, कणा मोडला, शरीरावर भळभळत्या जखमा करण्यात आल्या होत्या.परंतु तिची मृत्यूशी झुंज अखेर संपलीअसून तिने आज अखेर चा श्वास घेतला. मंगळवारी रात्री ३ वाजता दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. १४ सप्टेंबर रोजी क्रुरकर्म्यांनी तीची जीभ कापून टाकली होती. पाठीचा कणा तोडला होता. बाजरीच्या शेतात ती काम करण्यासाठी गेली असताना तिच्या वर चार व्यक्तींनी जबरदस्ती करत हे अमानुष कृत्य केले होते.ती बेशुद्ध अवस्थेत शेतात आढळली होती. सोमवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिला हलवण्यात आले होते.आणि आज तिने अखेरचा श्वास घेत वेदनेतून मुक्त झाली आहे.यापूर्वीच चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.परंतु आता आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान या घटने विरोधात पीडित युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील या रुग्णालयाबाहेर आता आंदोलन छेडण्यात आले आहे. पीडितेने प्राण सोडले त्यापूर्वीही अशीच गर्दी होती. कोपऱ्यात एक वृद्ध व्यक्ती खिन्न चेहऱ्याने बसली आहे आणि आपली मुलगी परत येणार नाही याची जाणीव झाल्या नंतर सुन्न अवस्थेत असलेला पिता आणि भाऊ यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही आहेत.सभोवताली माणसे जमली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button