Nandurbar

बनावट नोटा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 11 हजार 100 रुपये दराच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 11 हजार 100 रुपये दराच्या बनावट नोटा जप्त

फहिम शेख/नंदुरबार

दिनांक 09/02/2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणारा एक इसम बनावट भारतीय चलनी नोटा घेवून सोने खरेदी करण्यसाठी जाणार आहे अशी बातमी मिळाली. मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तात्काळ सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सांगुन संशयीत इसमास ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन शहादा येथे सदर इसमाला ताब्यात घेवून कारवाई करणेबाबत शहादा येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गरीब नवाज कॉलनी, शहादा येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे माहिती काढली असता. सदर इसम बनावट नोटा घेवून सोने खरेदी करण्यासाठी गेल्याचे माहिती समजून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील सर्व सराफ दुकानांवर जावून संशयीत इसम मिळुन येतो का याबाबत माहित घेत होते. त्याच दरम्यान 12.15 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सराफ बाजारात फिरत असतांना एक इसम संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव नाजीम रहिम बागवान वय-32 रा. गरिब नवाज कॉलनी,शहादा असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टचया खिशात 100 रूपये दराच्या एकुण 110 बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहे काय याचा शोध सुरु असून या रॅकेटच्या मुळापर्यंत पोलीस जातील असे मा.पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी सांगितले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. संदीप पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार/दीपक गोरे, पोलीस नाईक/ विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, गोपाल चौधरी, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई/यशोदिप ओगले, किरण मोरे, विजय ढिवरे, रामेश्वर चव्हाण यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button