Jalgaon

?जळगांव Live.. जळगाव जिल्हा हा तिसर्‍या लेव्हलमध्ये..! जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू..! जाणून घ्या काय असतील हे निर्बंध !

?जळगांव Live.. जळगाव जिल्हा हा तिसर्‍या लेव्हलमध्ये..! जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू..! जाणून घ्या काय असतील हे निर्बंध !

जळगाव जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी झाल्यामुळे आणि पॉझिटीव्हीटीचा दर खूप कमी असल्यामुळे काही बाबी वगळता संपूर्ण बाजारपेठ पूर्णवेळ सुरू करण्यात आली आहे. कोचींग क्लासेस, देवस्थाने, शाळा व महाविद्यालये आदी वगळता जळगाव जिल्ह्या अनलॉक करण्यात आला होता.मात्र आज राज्य सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार जळगाव जिल्हा हा तिसर्‍या लेव्हलमध्ये आलेला आहे. यामुळे या लेव्हलसाठी असणारे निर्बंध आपल्या जिल्ह्यासही लागू राहतील.याबाबत जिल्हा प्रशासन लवकरच स्थानिक पातळीवरून निर्देश जारी करण्यात येतील.

नवीन निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात तिसर्‍या लेव्हलसाठी असणारी खालील निर्बंध लागू असतील…

  • अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
  • हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील.
  • लोकल आणि रेल्वे बंद राहतील.
  • मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
  • 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
  • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
  • लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
  • बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
  • ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल.
  • जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश जारी केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button