खोपोली

नाट्य व चित्रपट अभिनय कार्यशाळेचे आयोजन …!

नाट्य व चित्रपट अभिनय कार्यशाळेचे आयोजन …!

खोपोली – खालापुर:
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी खालापुर मधील नडोदे या गावात ‘अवनीश कृषि पर्यटन केंद्र’ ह्या ठिकाणी व्ही. बी. एंटरटेनमेंट प्रस्तुत सात दिवसीय असे नाट्य व चित्रपट अभिनय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले असून. दिनांक ६ नोव्हेबर २०१९ रोजी ह्या कार्यशाळेची सांगता करण्यांत येणार आहे..या मध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अशी अनाजी पंत ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मा.महेश कोकाटे व रायप्पा हे पात्र साकारणारे अभिनेते मा. देवेंद्र सरदार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. महेश कोकाटे यांनी पूर्ण दोन दिवस विद्यार्थ्यांना स्लैप स्टिक कॉमेडी, नवरस, पदलालित्य, मायमिंग ह्यांचे प्रत्यक्षिकांसहित योग्य मार्गदर्शन केले. तसेच श्री. देवेंद्र सरदार यांनी हावभाव , एकाग्रता , निरीक्षण तसेच संवाद फेक अशा अनेक गोष्टींचे प्रत्यक्षिकांसहित मार्गदर्शन केले.

येथे शिबिरात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अभिनयातून व्यक्तिमत्व विकास देखील घडवला जातो. शिबिराच्या समारोपादिवशी शिबिरार्थिसाठी लघू चित्रपट बनविण्यात येणार असून त्यामागील उद्देश इतकाच की शिबिरार्थिना कॅमेरा फेस चे ज्ञान आणि अनुभव मिळेल त्यांची भीती जाईल. तसेच या कार्यशाळेला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते सर्व श्री. अजय तपकीरे, प्रभाकर वर्तक, स्वप्निल साने व महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारणाऱ्या कु. प्राजक्ता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच रंगभुषे साठी श्री. राजेश परब व संगीत विषयक तज्ञ श्री. संतोष बोराडे यांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे. अशी विश्वसनीय माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. राधिका साने आणि उपाध्यक्षा सौ. दर्शना कुलकर्णी सरदार यांनी दिली असून श्री. संजय शिंदे , सौ. रजनी दळवी, कु. योगेश ठाकुर हे या शिबिराची कार्यकारिणी सांभाळीत आहेत.

Leave a Reply

Back to top button