Nashik

येवला शहर हे सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी -पालकमंत्री छगन भुजबळ

येवला शहर हे सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी -पालकमंत्री छगन भुजबळ

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला शहर हे सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी नगरपालिकेसोबत नागरिकांनी देखील काळजी घ्यावी.त्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन, मुलभूत सुविधा, जनसुविधा, अल्पआसंख्यांक बहुल क्षेत्र विकास तसेच सार्वजनिक बांधकाम, प्राथमिक सोयी सुविधा, जिल्हास्तर नगरोउत्थान योजना, वैशिष्ट्यपुर्ण योजना व येवला नगरपालिका हद्दीत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना यासह विविध योजनांच्या माध्यमातून येवला नगरपालिका क्षेत्रात ११ कोटी ६६ लक्षच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, अरुण थोरात, नगरपालिकेचे बांधकाम सभापती शेख निसार अह. सगीर अह, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, मकरंद सोनवणे,नवनाथ काळे, ज्ञानेश्वर शेवाळे,सचिन कळमकर, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, नगरसेवक परवीन निसार शेख, दीपक लोणारी, प्रवीण बनकर, निसार शेख, अकबर शेख, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपभियंता उमेश पाटील, मुख्याधिकारी संगिता नांदुरकर, येवला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले
शिक्षण नसेल तर आपला विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करत आहोत. याचा तरुण तरुणींनी अधिक फायदा घ्यावा. लसीकरण झाल्यानंतरही काही प्रमाणात कोरोना होताना आढळून येतो आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्यांची देखील गाफील न राहता कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले.

येवला नगरपालिका हद्दीत अल्पआसंख्यांक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत येवला शहरातील अंबिया शाह कॉलनी शादीखाना हॉल बांधकाम, स.नं. ९/२ मध्ये समदनगर भागात वाचनालय बांधकाम, येवला नगरपालिका हद्दीत प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत विकास कामांचे भुमीपूजन, वेद कॉलनी स.नं. २३/३अ येथे संरक्षक भितींसह आधुनिक वाचनालय (इ.लायब्ररी) करणे, वेद कॉलनी भागातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे, हायवे ते दिलीप केदार पावेतो रस्ता/ कॉक्रीटीकरण करणे, कलावती आई मंदिर ते सोपान व्यवहारे यांचे घरापावेतो रस्ता कॉक्रीटीकरण, माया परदेशी यांचे घरापासुन ते गोरख सोनवणे यांचे घरापावेतो कॉक्रीटीकरण करणे, दिवटे पैठणी पासुन ते मारुती क्षिरसागर यांचे घरापावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे, वैशिष्टैयपुर्ण योजना अंतर्गत अमरधाम विकसीत करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

येवला नगरपालिका हद्दीत लोकशाहिर अण्णाखभाऊ साठे नागरी वस्तीं सुधार योजनेअंतर्गत प्र.क्रं. १२ वल्लभ नगर भागात नगरमनमाड हायवे ते किरण सदावर्ते ते शरद दाते पावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार, किरण सदावर्ते ते विजय गादी भंडार पावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे, गायकवाड यांचे घरापासुन ते आहिरे यांचे घरापावेतो रस्तास डांबरीकरण व भुमीगत गटार करणे, संजय कदम यांचे घरापासुन ते कोटमे घर ते पंडारे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे, अरुण कोकाटे यांचे घरापासुन ते कमलेश पाटील यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे, उपेद्र पारिख यांचे घरापासुन ते हेमंत नागपुरे यांचे घरापावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार कामाचे लोकार्पण करण्यात आले.त्याचबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वल्लसभ नगर भगातील स.नं. ६५अ/२ मध्ये व्यायाम शाळा विकसित करणे कामाचे भुमीपूजन, स.नं. १०२ लगत भागापासुन ते शुभकामना हॉटेल पावेतो गटार बांधकाम करणे, स.नं. ९० पासुन ते रोकडोबा मंदिराकडे जाणा-या पुलापर्यत गटार बांधकाम करणे, म्हसोबा मंदिरपासुन ते डॉ. पहिलवान हॉस्पीटल मागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे, भोसले यांचे पाटीमागील बाजु पासुन ते स.नं.९० पावेतो गटार बांधकाम करणे, हुडको पुलापासुन ते दराडे कॉम्प्लेक्स मागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे, मेट्रो बॅटरी दुकानाचे मागील बाजुपासुन ते सुनिल गवळी यांचे घरामागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे,बाजारतळ ते मनमाड राज्यत मार्गावरील पुलापर्यत गटार बांधकाम करणे, तर प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत येवला शहरातील हुडको नाला (जावळे निवास) ते बाजीराव नगर रस्ता कॉक्रीटींकरण करणे व पुलाचे बांधकाम करणे,विशेष रस्ता अनुदान अंतर्गत श्रीकृष्ण कॉलनी भागात रस्ते कॉक्रीटींकरण करणे कामाचे भुमीपूजन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button