Surgana

सुरगाणा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे शनिवारी वितरण कुलपती चिन्मय पंड्या राहणार उपस्थित

सुरगाणा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे शनिवारी वितरण
कुलपती चिन्मय पंड्या राहणार उपस्थित

विजय कानडे
गायत्री परिवार युगनिर्माण योजना ट्रस्ट नाशिक व स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्थेच्या वतीने सुरगाणा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि.10 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता मनखेड येथील अनुदानित आश्रमशाळेत होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरिद्वार येथील देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे कुलपती चिन्मय पंड्या, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नवसारी येथील सत्यसाई परिवाराचे हसमुखभाई लोहार उपस्थित राहणार आहेत. अनुदानित आश्रमशाळा मनखेड येथे होणा-या कार्यक्रमात गायत्री परिवार युगनिर्माणचे अध्यक्ष मणिभाई पटेल, जिल्हा समन्वयक मिनानाथ सोनवणे, कलावती चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नसीर मणीयार, प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय पगार यांनी केले आहे.

यांचा होणार गुणगौरव
भाऊसाहेब सरक, कारभारी निकम, लक्ष्मण बागुल, संजय गवळी, भागवत चौधरी, मोतीराम भोये, विवेक निकम, विनायक गावित, काशीनाथ बागुल, सगन गावित, राजेंद्र सूर्यवंशी, विक्रम राठोड, रमेश पवार, नवसू गावित, रामदास भोये, प्रतीक्षा गायकवाड, नारायण गावंडे, पांडुरंग चौधरी यांचा गौरव करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button