Nashik

जलसमृद्धीतून विकासाकडे या युवामित्राच्या अभियानातून चिचोंडी गावाला मिळणार जलसंजीवनी.

जलसमृद्धीतून विकासाकडे या युवामित्राच्या अभियानातून चिचोंडी गावाला मिळणार जलसंजीवनी.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला तालुक्यातील चिचोंडी येथे युवा मित्र सिन्नरच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली
चिचोंडी येथीलअगस्ती नदीपात्रातील बंधारे असूनदेखिल तेथील शेतकऱ्यांना पाण्याचा फारसा फायदा बंधाऱ्यातील गाळामुळे होत नव्हता,याचीच दखल घेऊन येथील शिवयोद्धा सोशल फाउंडेशनचे युवक यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत च्या सहकार्याने मागील वर्षी बेंद नाला परिसरात गाळमूक्त धरण व गाळयुक्त शेती या संकल्पनेतूने केलेल्या कामामुळे तेथील शेतकऱ्यांना झालेला पाण्याचा फायदा डोळ्यासमोर ठेवून युवा मित्रच्या संकल्पनेतून नाबार्ड फंड अंतर्गत पाटोदा येथे सुरू केलेल्या कृषी संपदा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक कानिफनाथ मढवई सर याच्या पाठपुराव्यातून आज टाटा ट्रस्ट मुंबई व गॅलक्सी संस्था मुबई याच्या सेस निधीतून गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन चिचोंडी बु सरपंच रविंद्र गुंजाळ संतोष मढवईसर उपसरपंच साईनाथ मढवई ग्रांमपंचायत सदस्यां सविता धीवर नारायण खराटे गाळ उपसा समिती अध्यक्ष बाबासाहेब मढवई समिती सदस्य सचिन पवार समा धान मढवई महेश पाटील काकासाहेब मढवई ,दत्तू माळी ग्रामसेवक व्यवहारे परसराम पवार शरद पवार चेतन पवार दत्तू सुर्यवंशी ज्ञानेश्वर गुंजाळ बाळू पवार किसन पवार समाधान लहरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते या कामासाठी मागील वर्षांपासून युवामित्र प्रोजेक्ट समुपदेशक मा नितीन आढांगळे प्रोजेक्ट समन्वयक मा अजित भोर सर्वे इंजिनिअर धनंजय देशमुख तालुका समन्वयक स्वप्निल कमोदकर क्षेत्रिय समन्वयक समाधान कासार ऑपरेटर विनोद कांबळे आदि मान्यवर कामाच्या यशस्वीते साठी खूप प्रयत्न करत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने .युवा मित्र संस्था सिन्नर तसेच टाटा ट्रस्ट व गॅलक्सि कँपणीकडून मोठे काम येथील परिसरात उभे राहत आहे म्हणून,त्याचे आभार मानण्यात आले त्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांना .बंधाऱ्यातील सुपीक माती शेतीसाठी उपयोगी असल्याने येथील शेतकरी गाळयुक्त माती टाकून आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी काम करणार आहे.येथील सर्व शेतकरी स्वताःच्या साधनाने गाळ वाहून नेऊन आपली शेती सुपीक करतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button