Chandwad

चांदवडच्या परिक्षार्थींचे आमदार रोहितदादा पवारांना साकडे

चांदवडच्या परिक्षार्थींचे आमदार रोहितदादा पवारांना साकडे

चांदवड उदय वायकोळे

चांदवड येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या परीक्षार्थींनी तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार यांचेशी MPSC तसेच सरळसेवा परिक्षाबाबत ट्विटरद्वारे मागणी केली होती.यानंतर चांदवड येथील परीक्षार्थी उदय वायकोळे,दत्तात्रय पवार,सुनील निकम यांनी फोनद्वारे आमदार रोहितदादा पवार यांचेशी संपर्क साधला.सध्या आमदार रोहितदादा पवार हे युवा विद्यार्थी तसेच परीक्षार्थी यांचे प्रश्न MPSC सचिव ,गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे मांडत आहेत.

मार्च 2019 पासून जिल्हा परिषद लिपिक,ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,आरोग्यसेवक ,MIDC मधील विविध पदांचे फॉर्म परीक्षार्थींनी भरलेले आहेत.त्यातच महापरिक्षा पोर्टल द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रिया थांबवून अन्य एजन्सी मार्फत निविदा मागवून परीक्षा घेण्याचे महाविकास आघाडीने योजलेले आहे.मात्र दीड वर्ष होऊनही परीक्षा होत नसल्याने परिक्षार्थींचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातच एजन्सी बदल झाल्याने जुन्या भरलेल्या फॉर्म ची फी वाया जाणार नाही याची खात्री आमदार रोहितदादा पवार यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button