Chandwad

चांदवड इच्छापूर्ती गणेशाच्या चरणी हजारो भाविक लीन

चांदवड इच्छापूर्ती गणेशाच्या चरणी हजारो भाविक लीन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले मंदिरात पहाटे भाविकांच्या वतीने ट्रस्ट कडून अभिषेक पूजन करण्यात आले
यावेळी पौरोहित्य मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी केले श्रींच्या मूर्तीस नवीन वस्त्र परिधान करण्यात आले चांदीचे आभूषणे घालण्यात आली यावेळी गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला विशेष पूजन म्हणून यावेळी केवडा महोत्सव करण्यात आला केवड्याच्या पानांची विशेष आरास करण्यात आली श्री इच्छापूर्ती गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर ट्रस्ट व चांदवड पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला येणाऱ्या भाविकांना श्री नरेन्द्र पाटील व सहकारी नांदगाव यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले सायंकाळी सात व रात्री चंद्रोदयाच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठीश्री हरिहर गोखले,सिद्धेश शर्मा,चिमणराव बागुल,पुंडलिक सोनजे,जितेंद्र डाके ,मयूर बिरारी,निवृत्ती काटे,काकासाहेब जाधव,रोहिदास गोधडे,अंकुश शिंदे,समाधान शिंदे,संदीप माळी, भावडू गोधडे आदींनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनखाली
श्री घोलप, स्वप्नील गोसावी, प्रशांत साळवे, दिपक जाधव,माधव गांगुर्डे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button