Amarawati

सेंट्रल किचन योजना बंद करा – अमरावती येथील धारणी बिरसा क्रांती दलाची मागणी

सेंट्रल किचन योजना बंद करा – अमरावती येथील धारणी बिरसा क्रांती दलाची मागणी

अमरावती / प्रतिनिधी – श्याम पाटणकर

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी च्या प्रकल्प अधिकारी मित्ताली शेठी यांना बिरसा क्रांति दल धारणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मेलघाट मधील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत काम करणारे रोजनदारी कर्मचारी स्वयंपाकी कामाठी हे लोक 15,16 वर्ष पासून आश्रम शाळेत काम करत आहेत मेलघाट मध्ये आश्रम शाळेत काम करणारे कर्मचारी यांची संख्या कमीत कमी 250 इतकी संख्या आहे यांच्या कुटुंब हया कामावरुन अवलंबुन आहे शासन यांच्यावर उपासमारीची वेळ आनत आहे. सेंट्रल किचन मुळे 1000 लोकावर अन्याय होणार आहे आदिवासी समाजासाठी सेंटल किचन योजना ही धोक्याची आहे तर फक्त आदिवासी विकास विभाग ठेकेदार जगवण्यासाठी ही योजना आखली आहे व आश्रम शाळा रायपुर या शाळेचे शासनांनी पुनर्वसन करण्याचे मार्गवर आहे तरी रायपूर शाळेचे पुनर्वसन करू नये या करीता “बिरसा क्रांति दल”नी पाऊल उचलले आहेत.
त्यावेळी बिरसा क्रांती दल धारणी तालुकाचे अध्यक्ष श्री.श्याम पाटणकर सर, उपाध्यक्ष श्री.भिलावेकर सर, सचिव श्री.बेठेकर सर, कार्यध्यक्ष श्री.फुलबाश धांडे, उपाध्यक्ष श्री.सुभाष सावलकर, महासचिव श्री.धुर्वे सर, व तालुका सदस्य तसेच रोजनदारी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button