sawada

Breaking: मास्तर तुम्ही सुद्धा…! शैक्षणिक क्षेत्राला काळीमा..3 मास्तरांसह सह  शाळेचे संचालका विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल!

Breaking: शैक्षणिक क्षेत्राला काळीमा..3 मास्तरांसह सह शाळेचे संचालका विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील कधी बोगस शिक्षक भरती तर कधी पोषण आहारचे तांदूळ विक्री तर कधी संस्था मंडळातील वादविवाद अशा विविध गैरप्रकारामुळे सतत संपुर्ण जिल्ह्यात बहुचर्चित इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वरे संचालीत ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत इ.८ वी मध्ये शिक्षण घेणारी एका अल्पवयीन मुलगीस तुला नविन (नकाब)देण्याचे आमिष दाखवून शाळात चेयरमन कार्यालयात बोलावून या कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केले आणि या ठिकाणी सुरू असलेले लाईट बंद करून शाळेचे संचालक अक्रम खान अमानुल्ला खान यांनी ती अल्पवयीन मुलीच्या शरीर व गुप्त अंगावर वाईट हेतूने स्पर्श करून तीचा विनयभंग करून,ही गोष्ट घरच्यांना सांगीतली तर याद रख,तुला शाळेतून काढून टाकेल अशी धमकी पिडीत मुलीस त्यावेळी या लिंगपिसाट संचालकाने दिली. यामुळे पिढीता भयभीत होऊन तीच्या वर्गात बसून रडू लागली.दुपारच्या सुट्टी नंतर शाळा भरली असता सदरचा गैरप्रकार पिढीत मुलीने तीचे वर्ग शिक्षक अर्शद सर व फिरोज सर यांना सांगितल्यावर शाळेचे मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान यांना सांगितली असता सदर घटनेची कुठेच व्याचता करायची नाही.असे सांगुन या गंभीर घटनेवर पर्दा टाकून लिंगपिसाट संचालकास वाचविण्याचे कार्य केले.यामुळे घटनेच्या दिवसांपासून पिढीत मुलगी शाळेत जाण्यास सारखी मनाई करू लागली.याचे कारण तीची आईने विचारल्यावर सदरची घटना पिडीत मुलीने ने सांगितली.ही हकीकत पती सह नातेवाईकांना पीडित मुलीच्या आईने सांगीतली.

यानंतर चर्चा होवून दि.७/८/२०२३ रोजी सावदा पोलिस ठाण्यात पिढीतेच्या फिर्यादीवरून शाळा संचालक अक्रम खान अमानुल्ला खान,मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान,क्लास टीचर शेख अर्शद शेख सईद,शेख फिरोज शेख सुपडू यांच्या विरुद्ध गुरनं.१८७/२०२३ भादवीचे कलम ३५४,३५४(ए)(१)३४ फोस्को कायद्याचे कलम ८,१७ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एपीआय जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button