Latur

हरित क्रांतीसाठी सरसावली ‘वसुंधरा’ वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे ,एक घर:दोन झाडं’ उपक्रम…

हरित क्रांतीसाठी सरसावली ‘वसुंधरा’

वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे ,एक घर:दोन झाडं’ उपक्रम

लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके

लातूर – हरित लातूर जिल्हा हे स्वप्न उराशी बाळगून गत सहा वर्षांपासून निसर्ग संवर्धन कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘वसुंधरा’ प्रतिष्ठान तर्फे एक घर:एक झाड अभियान हाती घेण्यास आले असून नागरिकांना वृक्ष संवर्धन साठी दत्तक देण्यात आले. विशेष म्हणजे वर्धमान कॉलनी येथील महिलांनी श्रमदान केले.

वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गत सहा वर्षांपासून लातूर जिल्ह्यात निसर्ग संवर्धन कार्यात योगदान देत आहे. या काळात एक विद्यार्थी-एक वृक्ष, झाडाचा गणपती, एक गणेश मंडळ:अकरा वृक्ष उपक्रम, पर्यावरण पूरक सण-उत्सव, एक मित्र-एक वृक्ष, निसर्गाशी मैत्री अभियान, वटसावित्री पौर्णिमेला वड झाड रोपण, प्लास्टिकमुक्त भारत अभियान, स्वच्छता अभियान, सेल्फी विथ ट्री, ट्री बँक, वृक्ष दत्तक योजना असे उपक्रम राबविण्यात आले. आता नव्याने एक घर:दोन झाड हा उपक्रम हाती घेण्यात आला असून प्रत्येक घरास दोन झाड जगविण्यासाठी दत्तक देण्यात येत आहे. वर्धमान कॉलनी येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी या भागातील महिला, युवक, युवती, नागरिक यांनी श्रमदान केले. शिवाय, वृक्ष संवर्धनासाठी झाडांना ट्री गार्ड बसविण्यात आले. लातूर जिल्हा हरित करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत.

श्रमदानातून लागवड झालेल्या वृक्ष मोहिमेत सुनील दुरुगकर, मनीषा दुरुगकर, राजेश दुरुगकर, वैशाली दुरुगकर, शांताबाई दुरुगकर, मनोज रामढवे, सुनिता रामढवे, परिमल रामढवे, प्रणिता रामढवे, रमेश रामढवे, प्रेमिला रामढवे, विशाल बीडकर, शिल्पा बीडकर, प्रमोद बीडकर, चंदा बिडकर, खानापुरे, संजय सोवितकर, वैद्य गुरुजी, कुणाल रामढवे, स्वराज रामढवे, रिषभ दुरुगकर, अक्षया रामढवे, साक्षी दुरुगकर, पल्लवी बीडकर, ईशांत रामढवे यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संघटक प्रशांत स्वामी, सदस्य अभिजीत स्वामी, नितीशा उबाळे यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली.

वृक्षारोपण करायचंय?
टीम ‘वसुंधरा’ शी संपर्क साधा

वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे लातूर शहरासह जिल्हाभरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यांच्याकडे वृक्ष लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि जे वृक्ष संवर्धन करण्याची हमी घेतील अशा परिसरात वृक्ष लागवड साठी वसुंधरा प्रतिष्ठानशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button