Surgana

सुरगाणा तालुक्यातील बोरपाडा येते खैराच्या लाकडाचे वीस नग हस्तगत वन विभागाची कारवाई पिक- अप गाडी सह लाकूड जप्त

सुरगाणा तालुक्यातील बोरपाडा येते खैराच्या लाकडाचे वीस नग हस्तगत वन विभागाची कारवाई पिक- अप गाडी सह लाकूड जप्त

विजय कानडे

सुरगाणा या भागात पावसाने विश्रांती घेतली आहे यामुळे खैरतस्कर टोळी पुन्हा सक्रिय झाली. मिळालेल्या माहितीनुसार बाऱ्हे वन परिक्षेत्रातील अधिकार्याच्या पथकाने सापळा रचला खैराची वाहतूक करणारी पिकअप वाहनातून वीस खैरची लाकडाचे वीस नग वन परिक्षेत्रातील कर्मचारीनी हस्तगत केले.
पळसन वन परिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळअंतर्गत भागातून एक पिकअप गाडी जिजे 15 झेड 4470 तून काय संशियत व्यक्ती खैराची लाकडाची अवैध वाहतूक करणार आहे. असल्याची माहिती वन पथकाल मिळाली त्यावरून नाशिक उप वनसंरक्षक पंकज वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी.कवर,फिरते पथक्काचे अधिकारी सुरेश गवारी, पळसन येतील वनपाल बी.सी.भोये वनरक्षक टि. एच. खांडवी, खडकमाळचे वनरक्षक वाय. एस.गावित यांचे पथक तयार केले. गुरुवारी ता.18/8/2022 रात्रीच्या एकच्या सुमारास जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला, कुणकुण लागताच खैर तस्करांनी. फरार होण्यासाठी साथीदारानी वाट बदलली वन कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या वाटेने वाहनद्वारे एक गुजरात जाणारी चोर वाटद्वारे गाडी पकडली खैराच्या लाकडानी भरलेली गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाची पासिग असलेली पिकअप गाडी ताब्यात घेत. पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणली.त्या वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी वाहनाची जप्ती आणि मालाचा पंचनामा केला संशयीत पिकअप चालकासह अज्ञात तस्कराविरुद्ध पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात वन
अधिनियम १९२७ च्या विधी कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.तरी तालुक्यांत मोठया प्रमाणात होणारी गो तस्करी माध्यमातून मोठ्या प्रमाणात पण ही तस्करी होऊ शकते असा संशय व्यक्त करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button