Nashik

येवला शहर व तालुक्यात दो बूंद जिंदगी की मोहीम यशस्वी

येवला शहर व तालुक्यात दो बूंद जिंदगी की मोहीम यशस्वी

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला शहर.व तालुक्यात दो बुदं जिंदगी की मोहीम जिल्हा परिषद नाशिक आरोग्य अभियानातंर्गत धुळगाव उपकेंद्राच्या वैदकिय अधिकारी अफीया फाझली यांच्या नेतृत्वखाली आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी यांचा सहकार्याने ग्रामीण भागातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी राबवून लहान मुलांच्या वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या विविध आजाराबरोबर अपंगत्व येऊ नये म्हणून पोलिओ डोस लस लहान मुलांना दोन थेब पाजून घेण्यासाठी पालक आपल्या लहान मुलांना अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र याठिकाणी पोहचून पोलिओ लसीकरण लस
पाजण्यासाठी सहभाग घेतला यावेळी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, मदतनीस यांनी आपली नेमून दिलेली जबाबदारी स्वीकारत पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला

आफिया फाझली अधिकारी, व शमा शेख आरोग्य सेविका,
यावेळी आशा स्वयंसेविका वाल्हुबाई जगताप, सुनिता राजगुरू, संगीता राजगुरू, अनिता खोडके, सुनिता मोरे आदीसह पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले

येवला शहर व तालुक्यात दो बूंद जिंदगी की मोहीम यशस्वी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button